समाजशील न्यूज नेटवर्क : शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडे बिबट्यांची संख्या वाढलेली दिसत असताना मागील एक ते दीड महिन्यांपासून बिबट्या मोठी लोकवस्ती असलेल्या कवठे येमाई गावठाणांत शिरकाव करीत अनेक पाळीव प्राणी,कुत्रे,वासरू यांचा फडशा पाडताना दिसून येत आहे. सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे गावठाण परिसर रात्री आठलाच सामसूम होत असून गावच्या सरपंच वर्षाराणी सचिन बोऱ्हाडे यांच्या मागणी नंतर शिरूर वनविभागाने तत्परता दाखवत आज तात्काळ एक पिंजरा गावठाणात दाखल झाला आहे.
आज पर्यत वाड्या-वस्तीवर वावर करणारा बिबट्या हा प्राणी आता निर्ढावलेला दिसत असून मागील दीड महिन्यांपासून कवठे येमाई गावठाण मध्ये पोहचला असून आत्ता पर्यत अनेक कुत्रे,शेळी व गायीचा बिबट्याने फडशा पाडला आहे. गावतील अनेक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झालेले असतानाच परवाच मध्यरात्री गावातील मळगंगा परिसरात वावरणाऱ्या जाण्या गाईचं ३ ते ४ महिन्याचं गोंडस वासराचा बिबट्याने फडशा पाडला.ह्या सर्व घटनेची माहिती शिरूर वन विभागास वेळोवेळी देण्यात येत होती. कवठे गावातील तरुण मुले व कवठे गावातील सरपंच व सर्व सदस्यांनी पाठपुरावा करून अखेर आज वन विभागाने पिंजरा लावला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन बोऱ्हाडे,अनिलकुमार रायकर,अमोल शिंदे,शरद साळवे,पंचरास,बाळू गोसावी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. गावठाणात पिंजरा लावल्याने यात बिबटया अडकेल व ग्रामस्थ भयमुक्त होतील अशी आशा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.