इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विरोधात तळेगाव ढमढेरे येथे शिवसेनेचे आंदोलन

64
समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : इयत्ता पहिली पासून हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विरोधात शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते सचिनभाऊ अहिर , पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र जी मिर्लेकर यांच्या सुचनेनुसार,पुणे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, संपर्कप्रमुख मनोज इसवे‌ यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव ढमढेरे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले. हिंंदी सक्तीच्या जी आर ची‌ होळी करत या आंदोलनात निषेध व्यक्त करण्यात आला. मराठीवर अन्याय सहन केला जाणार नाही,  हिंदी सक्ती बंद झालीच पाहिजे अशा घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. उपजिल्हाप्रमुख मच्छिंद्र गदादे, तालुकाप्रमुख पोपटराव शेलार, महिला तालुका संघटक चेतना ढमढेरे,तालुका सल्लागार मधूकर भंडारी, शिवाजी मचाले‌,अनिल करपे, कौस्तुभ होळकर, राहूल शिंदे, गणेश शिवले,कुंडलिक पवार,अनिल सातकर, भगवान सातकर आदींसह शिरूर तालुक्यातील माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना तसेच शिवसैनिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds