अलिबाग,रायगड : जिल्हा काँग्रेसच्या निर्णया विरोधात, पेण तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी व सदस्यांचे राजीनामे, माजी जिल्हा अध्यक्ष रविशेठ पाटील यांची भुमिका मात्र गुलदस्त्यातच

781
              अलिबाग,रायगड : पेण तालुका काँग्रेस कमिटीला बरखास्त करण्याचा ठराव प्रदेश कमिटी कडे पाठविण्याच्या जिल्हा कमिटीच्या निर्णया विरोधात पेण तालुका कॉग्रेस चे अध्यक्ष, महिला अध्यक्ष व सर्व सदस्यांनी आपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे कडे पाठवून दिले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष अनंत पाटील यांनी आज सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
             यावेळी महिला तालुकाध्यक्ष पूजा घरत, उपाध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस कृष्णा घरत, कासू विभाग अध्यक्ष वासुदेव म्हात्रे, वाशी विभाग अध्यक्ष जितेंद्र म्हात्रे, जिते विभाग अध्यक्ष रमेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या या निर्णयामुळे पेण मधील काँग्रेस मधील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे अनंत पाटील यांनी यावेळी सांगितले.16 डिसेंबर ला वैकुंठ निवास स्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत रायगड जिल्हयात शेकाप, राष्ट्रवादी बरोबर करण्यात आलेल्या आघाडीला कार्यकर्त्यांनी विरोध करुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, मात्र इतर दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा उल्लेख देखील झाला नसल्याचे अनंत पाटील यांनी सांगितले. मात्र कोणतीही शहानिशा न करता जिल्हा काँग्रेस कमिटीने तालुका कमिटी बरखास्त करण्याचा ठराव प्रदेश कमिटी कडे पाठविला असल्याने आम्ही सर्व पदाधिकारी राजीनामा देत असल्याचे तालुका अध्यक्ष अनंत पाटील यांनाही पत्रकार परिषदेत सांगितले.
         परंतु एकुण पेण तालुका – शहर काँग्रेसचे सर्वेसर्वा आधारस्तभं माजी मंत्री व काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष रविशेठ पाटील यांची भुमिका अद्याप स्पष्ट होत नाही, कारण माजी मंत्री रवि पाटील हे काँग्रेस सोडुन भाजपा च्या वाटेवर असल्याच्या चर्चा मागील काही दिवसापासुन एेकायला भेटत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण तसेच गांधीभवन व टिळक भवन यां काँग्रेसच्या मुख्यालयाचे फोन ला ही रवि पाटील रिप्लाय देत नाही. प्रेदेश काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमाला रवि पाटील उपस्थीत राहत नाही. याच कारणावरुन पेण काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय जिल्हा काँग्रेसने प्रदेश कडे पाठविला असल्याची कानोकानी खबर आहे.
– प्रतिनिधी,सारिका पाटील,(सा.समाजशील.अलिबाग)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *