समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिवराज्य प्रतिष्ठाण आणि निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच बापूसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या भागात हिंदू पर्यटकांवर जो दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि दहशतवाद्याना शिक्षा व्हावी यासाठी शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी गावात रॅली चे आयोजन करण्यात आले होते. दिलीप चव्हाण, दादासाहेब घोरपडे, श्रीमती तान्हूबाई चव्हाण,आशाताई कुंभार,स्वातीताई दोरगे, शिवराज पवार, आर्यन चव्हाण, भूषण दौंडकर, आदित्य कुटे,प्रणित कांबळे, संस्कार महाडिक, युवराज चव्हाण, प्रेम लोखंडे, आदर्श गायकवाड, शौर्य दोरगे, शंभू चव्हाण, राजकुमार कांबळे, साक्षी कुंभार, हर्षदा कुंभार,अनुष्का घोरपडे, प्रांजल दोरगे, तनिष्का घोरपडे, स्वरा सूर्यवंशी, श्रेया सूर्यवंशी यांच्यासह अनेक ग्रामस्थ सदर रॅली मध्ये सहभागी झाले होते. हिंदू पर्यटकांवरती झालेला हल्ला हा अंत्यत क्रूर असून धर्माच्या नावाखाली त्यांना मारले गेले हे अतिशय निंदनीय आहे. बरेच पर्यटक या हल्ल्या मध्ये जखमी झाले आहेत. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. सरकारने लवकरात लवकर त्या दहशतवाद्यांना फाशी द्यावी म्हणजे आपल्या हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या हिंदू पर्यटकांच्या आत्म्यास शांती मिळून मृत्युमुखी पडलेल्या हिंदू पर्यटकांना तीच खरी श्रद्धांजली असेल असे मत निमगाव म्हाळुंगी चे सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री बापूसाहेब काळे यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप चव्हाण यांनी केले तर आशाताई कुंभार यांनी सहभागी झालेल्या देशभक्तांचे आभार मानले.
Home शिक्रापूर निमगाव म्हाळुंगी मध्ये कॅण्डल मार्च रॅली काढून पहलगाम येथील हल्ल्यात झालेल्या मृत पर्यटकांना श्रद्धांजली

निमगाव म्हाळुंगी मध्ये कॅण्डल मार्च रॅली काढून पहलगाम येथील हल्ल्यात झालेल्या मृत पर्यटकांना श्रद्धांजली
BySamajsheelApril 26, 20250
Previous PostPlateforme Trading Top 9 Plateformes pour 2025
Next Postपूर्वीच्या भांडणातून लोखंडी रॉड ने मारहाण : कवठे गावठाणात यात्रे दरम्यानची घटना


