समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या घोडे वस्तीत वास्तव्यास असणारे विष्णू अनाजी भाईक यांचा सैन्यदलात कार्यरत असणारा मुलगा संभाजी विष्णू भाईक हा गावी आला असताना दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान आरोपी संतोष बबन भाईक,योगेश बबन भाईक रा. कवठे येमाई, घोडे वस्ती ता. शिरूर जि. पुणे,बाळासाहेब बबन घोडे रा. इनाम वस्ती, कवठे येमाई ता. शिरूर जि. पुणे व त्यांचे श्लोक अकॅडमी शिरूर येथील अनोळखी १२ इसम नाव पत्ता माहित नाही यांनी सकाळी कवठे गावात संतोष बबन भाईक बरोबर झालेल्या वादातून संभाजी भाईक यांना घोडेवस्ती नजीकच्या येथील हॉटेल किनारा येथे गाठवत प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात फौजी संभाजी भाईक हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या पत्नीने या घटने बाबत शिरूर पोलिसांत रीतसर फिर्याद दिली असून आरोपींविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. नंबर २५०/२०२५ प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम १८९/२,१९१/२,१९१/३,१९०,७४,११८/ १,११५/२,३५२,३५१/२/३,महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली.
संभाजी भाईक यांच्या पत्नीने शिरूर पोलिसांत दिलेल्या तक्रारी नुसार दि. १२ ला सकाळी साडेआठच्या दरम्यान फिर्यादी या यांच्या घराच्या जवळील हापस्यावर पाणी आणण्यासाठी गेल्या असता आरोपी संतोष बबन भाईक याने तेथे येत फिर्यादी यांची छेडछाड करीत,हात धरीत, मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार फिर्यादी यांच्या पतीने पाहताच ते तेथे पळत आल्याचे पाहून आरोपी संतोष भाईक तेथून पसार झाला.त्यानंतर गावची यात्रा असल्याने फिर्यादी यांचे पती संभाजी भाईक हे देवीचा पालखी सोहळा पाहण्यासाठी गेले असता तेथे भेटलेल्या आरोपी संतोष भाईक यास पत्नीची छेड काढल्याचा जाब विचारात दोघांची भांडणे झाली होती. याचा राग मनात धरून आरोपी संतोष बबन भाईक व योगेश बबन भाईक इत्तर १३ जणांनी त्याच दिवशी सायंकाळी सहाच्या दरम्यान हॉटेल किनारा येथे फिर्यादी यांचे पती संभाजी विष्णू भाईक हे जेवण करून बाहेर येताच वरील सर्व आरोपींनी त्यांचेवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संभाजी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. पोलीसांनी त्यांना औषध उपचार कामी शिरूर ग्रामीण रूग्णालय येथील मेडीकल यादी दिली तेथे वरील सर्वानी त्यांना झालेल्या जखमांवर औषध उपचार केले. परंतू फिर्यादी यांचे पति संभाजी यांना जास्त त्रास होवू लागल्यांने त्यांना तेथील डॉक्टरांनी ससून हॉस्पिटल पुणे येथे रेफर केले होते परंतू पति संभाजी यांना डोळयाचा जास्तच त्रास होवू लागल्यांने आम्ही त्यांना ससून हॉस्पिटल पुणे येथे न घेवून जाता शिरूर येथील वेदांत हॉस्पिटल मध्ये नेहून ऍडमिट केले तेथे त्यांचेवर उपचार करण्यात आले असून फिर्यादी यांचे पति संभाजी हे औषध उपचार घेत असल्यांने त्यांना तक्रार देता आली नव्हती ती त्यांनी दि. १४ रोजी शिरूर पोलिसांत दिली आहे. घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वारे करीत आहेत.