यातील पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून ज्ञानगंगा शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड
पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी या संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड अध्यात्म-विज्ञानाधिष्टीत वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती २०२५ मधील सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर , माईर्स एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, मा. कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण तर बालभारतीचे विशेष अधिकारी डॉ. अजयकुमार लोळगे हे सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरयांच्या हस्ते सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
डॉ. पंकज भोयर म्हणाले, “राज्यात १ लाख ८ हजार शाळा आहेत. त्यात ६५ हजार शासकीय शाळा असून तेथे विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. आदर्श शाळा निर्माण करून उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परिस्थितीवर मात करण्याची विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवावी. तसेच कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे लक्षात ठेवावे.”
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “चारित्र्यसंवर्धन आणि जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी वैश्विक मूल्यांचा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न आहे.” डॉ. अजयकुमार लोळगे म्हणाले, “श्रुती, स्मृती,कृती हे विद्यार्थी जीवनात सर्वात महत्वाचे तत्व आहे.” प्रा.स्वाती कराड चाटे म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श घेऊन मूल्यावर्धीत शिक्षण घेण्याचे धडे गिरवावेत.”डॉ. एस. एन. पठाण यांनी या उपक्रमाच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली.
तर ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरुर शाळेचे प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना गंगा एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका अमृता घावटे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुप्रिया होले यांनी सूत्रसंचालन केले. तर देवयानी पालवे यांनी आभार मानले.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे
पश्चिम महाराष्ट्र विभागः सोहम संग्राम गंभीरे (प्रथम, संत ज्ञानेश्वर विद्यालय, कोथरूड, पुणे), दर्शन सतीश जगदाळे (द्वितीय, विश्वशांती गुरुकुल, पंढरपूर), आर्य सचिन लोखंडे (तृतीय, अभिनव विद्यालय, पुणे), पायल संदीप बोरुडे (चतुर्थ,ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरूर), वेदिका संतोष बडे (पाचवा, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरुर)
पश्चिम महाराष्ट्र विभागः सोहम संग्राम गंभीरे (प्रथम, संत ज्ञानेश्वर विद्यालय, कोथरूड, पुणे), दर्शन सतीश जगदाळे (द्वितीय, विश्वशांती गुरुकुल, पंढरपूर), आर्य सचिन लोखंडे (तृतीय, अभिनव विद्यालय, पुणे), पायल संदीप बोरुडे (चतुर्थ,ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरूर), वेदिका संतोष बडे (पाचवा, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरुर)
