समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर ग्रामपंचायत वतीने राबविण्यात येणाऱ्या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 या अभियानाचा शुभारंभ शिक्रापूर येथील शासकीय विश्रामगृहात 15 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आली. यावेळी सहाय्यक अभियंता अश्विन पवार, अजय वाघमोडे, राजेश कुंभार, शाखाधिकारी सुनील मस्के, खंडेराव तनपुरे, गिलबिले, सावंत तसेच ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, समाधान डोके, दत्तात्रय टेमगिरे, पंढाभाऊ गायकवाड, सत्यवान भुजबळ, नाना हिरवे, मंगेश चव्हाण, उमेश पांडे, दिवसे मॅडम आणि परिसरातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 18 व 19 एप्रिल रोजी पाणी वापर संस्था व शेतकरी संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये भूसंपादन, पुनर्वसन व इतर विषयांवर नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले.