शिक्रापूर येथील वेळ नदी बंधारे, राऊतवाडी व बुधे वस्ती, येथे पाऊस कमी झालेने पाणी नाही तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विहिरींचे पाणी कमी झालेले आहे. सध्या चासकमान प्रकल्पाचे पाणी शिक्रापूर मधील वेळ नदीला सर्व ओढ्यांना व तळयामध्ये पाणी सोडण्यात यावे. पाणी सोडलेस पाणीपुरवठा विहिरीची व कुपनलीकेची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल व गावातील वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा करणे, पिके जगवणे शक्य होईल तसेच जनावरे जगवणे शक्य होईल. तरी वेळ नदी, बंधारे, राऊतवाडी व बुधे वस्ती, चारी नं. ११,१२, १३ ला चासकमान कॅनॉलचे पाणी सोडण्याची पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. यावेळी आदर्श सरपंच रमेश गडदे , उपसरपंच वंदना भुजबळ, प्रकाश वाबळे, सुभाष खैरे ,रमेश भुजबळ ,तानाजी राऊत, दत्तात्रय राऊत ,पंढरीनाथ गायकवाड ,अनिल राऊत,शाखाधिकारी सुनील म्हस्के उपस्थित होते.

चासकमान कालव्यातून शिक्रापूर परिसरात पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी
BySamajsheelApril 23, 20250
समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : येथील मोठ्या प्रमाणात झालेले नागरिकीकरण, शेती, जनावरे व पशुपक्षी यांची तहान भागवणे व पिकांना जागवण्यासाठी शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने चासकमान कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली असून रणरणत्या उन्हाता शेतकरी, नागरिक, जनावरे व पशु-पक्षी यांच्यासाठी तरी आता पाणी सोडण्यात येणार का ? असा प्रश्न निर्माण झाला असून चासकमान बंधारे विभाग पाणी सोडण्यासाठी सकारात्मक विचार करुन तातडीने पाणी सोडतील असा विश्वास शिक्रापूरचे आदर्श सरोंच रमेश गडदे , ग्राम पंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी व्यक्त केला.
Previous Postजल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शिक्रापूर येथे उत्साहात शुभारंभ
Next Postकांद्याच्या आरणीवरून वाद : एकावर सात जणांचा हल्ला : शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल