कांद्याच्या आरणीवरून वाद : एकावर सात जणांचा हल्ला : शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

172

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे येमाई च्या इचकेवाडीमध्ये शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शेजारील सात जणांनी हल्ला केल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी सकाळी बाराच्या दरम्यान घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु. र. नं.२५९/२०२५ अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी बाबुराव सगाजी इचके वय ४६ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कवठे येमाई यांनी दिलेल्या फिर्याद व  तक्रारीनुसार, ते आपल्या गट नं. २९१ या मालकीच्या जमिनीत पत्नी अनिता, मुलगी धनश्री, चुलत भाऊ सोमनाथ इचके आणि काही नातेवाईकांसह कांद्याच्या आरणीचे (कांदा  साठवणुकीची चाळ) चे बांधकाम करीत असताना ही घटना घडली आहे. याच दरम्यान त्यांचे शेजारी आशा बबन इचके,राजेंद्र बाळकृष्ण इचके,सुरेखा राजेंद्र इचके,यश राजेंद्र इचके, मंगल बाळकृष्ण इचके, रूपाली संतोष इचके ,संतोष बाळकृष्ण इचके राहणार सर्व इचकेवाडी, कवठे येमाई यांनी जमाव जमवून ही जमीन आमची आहे,येथे आरण बांधू नका असे म्हणत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे बाबुराव इचके यांनी शिरूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिरूर चे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास पो.ह.वा. बनकर  हे करीत आहेत.
या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत कलम ११५/२,३५२,३५१/२/३,१८९/२,१९१/२,१९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी शिरूर पोलीस पुढील कारवाई करत आहेत.शेतीच्या मालकीवरून वादहोणे हा काही नवा विषय नाही, पण यामुळे हिंसाचाराला सामोरे जावे लागणे ही चिंतेची बाब आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने घेऊन त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds