समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे ; (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या इचकेवाडी येथे जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील लोकांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संतोष बाळकृष्ण इचके वय ४० रा.इचकेवाडी,कवठे येमाई यांनी शिरूर पोलीसांत दिलेल्या फिर्यादीनुसार बाबुराव सगाजी इचके,सगाजी कोंडाजी इचके,अनिता बाबुराव इचके आणि इतर पाच नातेवाईकांविरोधात गु.र.नं. २६०/२०२५ अन्वये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली.
ही घटना १८ एप्रिल रोजी सकाळी पावणे बाराच्या दरम्यान घडली असून संतोष बाळकृष्ण इचके,राहणार इचकेवाडी,कवठे येमाई यांनी शिरूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीच्या गट क्र.१०४ या जमिनीच्या शेजारी आरोपी कांद्याची आरण (चाळ) बांधण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा संतोष इचके व त्यांचे कुटुंबीय भाऊ राजेंद्र,भावजय सुरेखा,आई मंगल आणि पत्नी रूपाली यांनी बांधकाम थांबवा म्हणून सांगितले असताआरोपींनी चिडून जाऊन त्यांना मारहाण केली,शिवीगाळ व दमदाटी केली,असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वारे करीत आहे.

जमिनीच्या वादातून हाणामारी : सहा जणांविरोधात शिरूर पोलीसांत गुन्हा दाखल
BySamajsheelApril 21, 20250
Previous Postकांद्याच्या आरणीवरून वाद : एकावर सात जणांचा हल्ला : शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Next Postपुण्यात महाआरोग्य शिबीर संपन्न : १२ हजार ७६९ जणांची रुग्णसेवा श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत एक दिवसीय मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन