समाजशील न्युज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट,सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे एकाचछताखाली विविध ६४ विभागांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबीरात १२ हजार ७६९ जणांची विनामूल्य तपासणी व उपचार करण्यातआले.हे महा आरोग्य शिबीर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात पुणे सह राज्याच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांच्या आरोग्याची तपासणी,काळजी घेत विविध साहित्य व औषधे वाटप करण्यात आली. या महा आरोग्य शिबीरात ५९ रुग्णालये आणि ५ संस्थांचे ४०५ तज्ञ व कार्यकर्ते शिबीरात अखंड सेवा देत होते.
या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव गोपाळ गीते यांच्या हस्ते झाले.उद्घाटनप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने,धनकवडीचे डॉ. दिनेश रंगरेज,श्रीकांत अष्टेकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या महा आरोग्य शिबीरात हृदय आजार,कर्करोग, किडनी, नेत्र आजार, दंत उपचार, स्त्री रोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फुट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबीर, ईएनटी, आयुर्वेदिक,होमिओपॅथी उपचार,अस्थिरोग,विविध थेरपी, रेडिओलॉजी,श्रवण आणि स्पीच थेरपी उपचार विनामूल्य करण्यात आले.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका,विविध योजनांचा लाभ कसा याची माहिती देखील देण्यात आल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले.मागील वर्षी तब्बल ७२ हजार ४८३ रुग्णांनाआरोग्यसेवा देण्यात आली. तर त्याआधीच्या वर्षी ४१ हजार ८७७ रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.यापुढेही अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.या महाआरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला.वर्षभरात ट्रस्टशी संलग्न विविध २२३ रुग्णालये आणि विविध संस्थांमधून आरोग्य सेवा दिली जातआहे. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबीर व विविध शाळांमध्ये आरोग्य शिबीराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे आरोग्यसेवेचे कार्य उत्तम असून अधिकाधिक लोकांना याचा लाभ व्हावा अशी सदिच्छा या शिबीरास उपस्थित युवा क्रांती फोंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक श्रीमती वर्षा नाईक यांनी सा.समाजशील शी बोलताना व्यक्त केली.