समाजशील न्यूज नेटवर्क,चाकण,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरूनगर) तालुक्यातील आगरवाडी,चाकण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मधुकर बाबुराव छत्रीकर यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ सेवा कार्यकाळ समाप्त झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती,निरोप,सत्कार समारंभ काल दि.१९ ला तालुक्यातील भाम गावातील जयशंकर बॅकवेट हाॅल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे,खेड पंचायत समिती शिक्षणाधिकारी राजेंद्र टिळेकर .केंद्र प्रमुख राजीव आबेंकर,शालेय व्यवस्थापन समिती.आगरवाडी.चाकण अध्यक्ष संदीप जाधव, युवा क्रांती फौंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक,पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष अंकुशराव आगरकर, छत्रीकर यांचे अनेक सहकारी,मित्र,चाकण,बहिरवाडीतील ग्रामस्थ,शिक्षक,केंद्र प्रमुख, मित्र परिवार,स्नेही,आगरकर वाडीतील अनेक ग्रामस्थ कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक मधुकर छत्रीकर यांच्या शिक्षक म्हणून कार्यरत असताना केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. अनेक वक्त्यांनी छत्रीकर यांच्या अगदी सुरवातीच्या कार्यकाला पासून सेवानिवृत्ती पर्यंत हृदयस्पर्शी जीवन प्रवास व्यक्त करताना अनेक उपस्थितांचे मन भरून आलेले पाहावयास मिळाले. तर अनेकांनी आपल्या नयनातून अश्रुंना वाट मोकळी करून दिल्याचे पहावयास मिळाले.
सेवानिव्रुत्त मुख्याध्यापक छत्रीकर यांची एक लोकप्रिय व समाजप्रेमी शिक्षक म्हणून ख्याती असून त्यांना तबला,पेटी,हार्मोनियम,पखवाद आणि मुख्य म्हणजे बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून गाणी आणि नाटकातुन केलेले समाज प्रबोधन याचे उपस्थित अनेक मान्यवरांनी कोड कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचे शिक्षक भोर,रामाणे मॅडम यांनी तर आभार कुंभार मॅडम यांनी मानले.