समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील मलठण येथील ग्रामपंचायत सभागृहात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मलठणचे ग्रामविकास अधिकारी संतोष भाऊ गायकवाड,सरपंच माधुरी थोरात,उपसरपंच किरण शिंदे, माजी उपसरपंच दादासाहब गावडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष गायकवाड,पेन्शनर संघटनचे अध्यक्ष सुदामराव गायकवाड, रामोशी संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र बोडरे,नाथा गायकवाड, सखाहरी झोडगे व अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. येथील अमृत सरोवर परिसरामध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड म्हणाले कि,हर घर संविधान अभियानाद्वारे संविधानाविषयी जागरूकता गावातील प्रत्येक नागरिकांमध्ये केली जाईल.संविधान चे प्रास्ताविक वाचन करून प्रतिज्ञा घेण्यात आली तर उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.