शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूरच्या आंबेकर मळा येथील सेवानिवृत्त आधिकारी दीपक बापूराव आंबेकर यांचे काल दि. २८ ला निधन झाले. मृत्यू समयी ते ६८ वर्षे वयाचे होते.मागील अनेक दिवसांपासून ते आजारी च होते.पुण्यातील रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
प्रगतीशील शेतकरी विकास आंबेकर ,बोरा महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते विलास आंबेकर ,शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती व शिरूर शहर कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष नोटरी किरण आंबेकर यांचे ते बंधु होते.