शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – भारत सरकारकडे नोंदणीकृत व आय एस ओ मानांकन प्राप्त असलेल्या युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटनेत राज्याच्या विविध भागात आपल्या कर्तृत्वातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट ठसा उमटवत असलेल्या विविध पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,ग्राम प्रतिनिधी,शेतकरी,महिला पदाधिकाऱ्यांची जिल्हा तालुका,गाव नुसार नियुक्ती करण्यात येणार असून संघटनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व सामाजिक क्षेत्रात,विशेषकरून शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीने सोडविण्याची कार्यक्षमता असलेल्या राज्यातील सर्व जिल्ह्यातील अशा व्यक्तींनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,मुख्य मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार सुभाष अण्णा शेटे यांनी केले आहे.
मंच च्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी जयश्रीताई अहिरे, राष्ट्रीय मार्गदर्शक आनंदराव पगार,राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष पदी अमृतताई पठारे,महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्ष पदी,वैशालीताई बांगर,महाराष्ट्र प्रदेश महिला सह – कार्याध्यक्षपदी वसुधाताई नाईक,तर पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष म्हणून वर्षाताई नाईक यांचे निवड झाली आहे.ही निवड संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा मंच चे राष्ट्रीय महासचिव रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप नाना साहेब महाराज कापडणीस व मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रा. सुभाष शेटे यांच्या विचार विनिमयातून करण्यात आली आहे.
मंच मध्ये राज्यातील विविध जिल्हे,तालुके,गाव पातळीवर विविध पदांवर तात्काळ नियुक्त्या होणार असल्याने शेतकऱ्यांच्या निगडीत प्रश्नांची जाण व ती विनाशर्त सोडविण्याकामी झोकून देऊन सनदशीर मार्गाने लढा देण्याची क्षमता असलेल्या शेतकरी,पत्रकार,विविध स्तरातील नागरिक,महिलांनी मंचचे प्रदेशाध्यक्ष पत्रकार प्रा. सुभाष शेटे यांच्या ९९७५६७४२८६,९४२३०८३३७६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,तक्रार निवारण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप नाना महाराज कापडणीस राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार व राष्ट्रीय किसान विकास मंच च्या सर्वच संचालक मंडळ व पधाधिकाऱ्यानी केले आहे.