समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :सर्व वारकरी भाविक भक्तांना आळंदीच्या कार्तिकी एकादशीची आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्याची ओढ लागली आहे. दरवर्षी लाखो वारकरी भाविक हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवत असतात.पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची मागील १७ वर्षांपासून शिक्रापूर येथे स्वागत व सेवा करण्यात येत असते यावर्षीही दिड्यांचे स्वागत करत फराळाची सेवा करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापुरचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी दिली. कार्तिकी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर माऊली च्या दर्शनासाठी आळंदी च्या वाटेने जाणार्या सर्व दिंड्याचे माऊली सेवा मंडळ शिक्रापूर यांच्या वतीने मागील १७ वर्षांपासून मोठ्या भक्तिभवाच्या व उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात येऊन वारकऱ्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे व संध्याकाळच्या जेवांचे अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते. वारकरी येथे अभंग गात,आशीर्वाद देत असतात तर थकलेले, भागलेले वारकरी आराम करतात गावकऱ्यांशी संवाद साधतात.यामुळे वारकरी व सेवेकरी ग्रामस्थ असे माणुसकीचे एक अनोखे नाते निर्माण झाले असून शिक्रापूर येथे ६५ ते७० दिंड्यातील शेकडो वारकऱ्यांची सेवा शिक्रापूर ग्रामस्थ करत असतात. यावेळी ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे,मोहन विरोळे, कांतीलाल भुजबळ, जयाभाऊ विरोळे, दिलीप भुजबळ, पोपट गायकवाड, भरत म्हेत्रे, चौरसिया बंधू, बलदोटा बंधू ,शांताराम राऊत, पंढरीनाथ राऊत, पटेल बंधू, पानमंद बंधू हारून इनामदार ग्रामस्थ उपस्थित होते.
Home बातम्या पुणे कार्तिकी वारीला जाणाऱ्या दिंड्याची शिक्रापूर येथे माऊली सेवा मंडळाच्या वतीने अन्नदान सेवा
कार्तिकी वारीला जाणाऱ्या दिंड्याची शिक्रापूर येथे माऊली सेवा मंडळाच्या वतीने अन्नदान सेवा
BySamajsheelDecember 5, 20240
24
Previous Postविद्यार्थ्यांचे सुसंस्कृत व उज्वल भविष्य घडवण्यासाठी कटिबद्ध - मनीषा गडदे
Next Postराष्ट्रीय किसान विकास मंच,माहिती अधिकार संघटनेत कार्य करण्याची संधी - सुभाष अण्णा शेटे - जिल्हा तालुका,गाव नुसार नियुक्ती होणार