समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील चांडोह गावाला नवीन सिंगल फेज लाईन उभारणी सुरु असून या लाईनचे ७० टक्के काम पूर्ण झालं असताना काल दि. २८ पंच तळे ते चांडोह नजीक या लाईनवरील ६ खांबा दरम्यानच्या ९०३ मीटर अंतराच्या ३ अल्युमियमन तारांवर चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रकार घडला असून यात संबधीत लाईन काँट्रॅक्टर एस के एन्टरप्रायझेस यांचे सुमारे ७० हजार रुपयांचे असून झाले असल्याची माहिती सुशीलकुमार व स्थानिक विद्युत सहायक अभिजित कडू सामाजिक कार्यकर्ते जालिंदर वळसे पाटील,पोलीस पाटील सुदर्शन भाकरे यांनी दिली.
दरम्यान या चोरीच्या घटनेबाबत शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शरद व्ही माने व टाकळी हाजी शाखा अभियंता नितीन मुरकुटे यांना ही माहिती तात्काळ देण्यात आली. परंतु ही सिंगल फेज वाहिनी आंबेगाव तालुक्यातून येत असल्याची माहिती मिळाली.असून तेथील ग्रामस्थांनी तिकडच्या महावितरण कार्यालयास संपर्क साधला. सध्या चांडोह गावठाण व परिसरासाठी या नवीन सिंगलफेज उभारणी चे काम सुरु असून बंद व अद्याप सुरु न झालेल्या या सिंगलफेज लाईन वरील तिहेरी तारा चोरीस गेल्याने मोठी च खळबळ उडाली आहे. तर अशा प्रकारची या परिसरात प्रथमच घटना घडल्याचे पोलीस पाटील सुदर्शन भाकरे यांनी सांगितले. तर या घटनेचा पोलिसांनी तात्काळ छडा लावून संबंधित या घटनेतील चोरट्यांना गजाआड करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ शेतकऱ्यांमधून होत आहे.