शिरूर,पुणे (सा.समाजातील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील तरुण संदीप रामदास सावंत यांचे आज रविवार दि. २९ ला सकाळी सहाच्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ४० वर्षांचे होते, त्यांच्या पश्चात आई,वडील,२ बहीण,मुलगा असा परिवार आहे. युवावा क्रांती फाउंडेशनचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष पंकज सावंत यांचे ते चुलत बंधू होते. त्यांच्या अकाली निधनाने सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.