समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत 26 जून रोजी शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. या प्रसंगी प्रशालेचे नवनिर्वाचित सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अविनाश कुंभार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती प्रशालेचे उपशिक्षक चंद्रशेखर सातपुते व प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.