समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक तथा पुणे धनकवडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वर्षा नाईक यांच्या सामाजिक क्षेत्रातील व संघटनेतील भरीव संघटन कौशल्य कार्याची युवा क्रांती संघटनेकडून दखल घेण्यात आली असून नुकत्याच दि. २१ रोजी शिर्डी येथे झालेल्या संघटनेच्या ३ ऱ्या वर्धापन दिन सोहळा व राज्यस्तरीय मेळाव्याच्या विशेष कार्यक्रम सोहळ्यात श्रीमती वर्षा नाईक यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार २०२५ ने संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री ताई अहिरे,राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा अमृत ताई पठारे,राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा. सुभाष शेटे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह,प्रशस्तीपत्र,शाल,गुलाब गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


श्रीमती वर्षा नाईक यांना त्या सामाजिक क्षेत्रात व युवा क्रांती संघटनेत करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबाबद्दल व कुशल संघटनात्मक कार्याबद्दल युवा क्रांती फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श संघटन कौशल्य महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 चा सन्मान युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला प्रमुख संघटक,जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वर्षा नाईक यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल युवा क्रांती संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक,अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय संघटक डॉ.राजेश्वर हेंद्रे,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री ताई अहिरे,राष्ट्रीय उपाध्यक्षा अमृत ताई पठारे,तक्रार समिती अध्यक्ष हभप नाना महाराज कापडणीस,पत्रकार सुभाष अण्णा शेटे,शिवाजीराव शेलार,हभप मधुकर महाराज अहिरे,नानासाहेब बढे,विजय माणगावकर,समीर नाईक,प्रियांका ताई शेलार,डॉ.मधुसूदन घाणेकर, व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करीत हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.