समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – मागील ५० वर्षे राजकारणात सक्रिय व एकनिष्ठ राहिलेले व बेट भागाचा विकासपुरुष संबोधले जाणारे,राजकीय जीवनाच्या प्रवासात वयाच्या ८५ व्या वर्षात ही बेट भागातील गावागावातील सर्वसामान्यांच्या सुख,दुःखात सातत्याने सहभागी होणारे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,त्यांचे कुटुंबीय व त्यांचे चाहते,समर्थक जेव्हा पक्षाशी एकनिष्ठ राहून ही ऐनवेळी जिल्हा परिषदेचे कवठे-टाकळी हाजी गटातील गावडे यांचे पुत्र राजेंद्र गावडे यांचे तिकीट कापल्याने निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. कमळ हाती घेत पुन्हा एकदा जोरदार प्रचार,गाठीभेटी घेत मतदारांशी थेट संपर्क साधत जिल्हा परिषदेसह दोन्ही गणात भाजपाचा झेंडा उंचविण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे शिरूरच्या या बेट भागात जिल्हा परिषदेसह पंचायत समितीसाठी ही मतदार कमळ फुलविणार ? याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.
माजी आमदार पोपटराव गावडे,माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.सोनभाऊ गावडे,त्यानंतर सुनीताताई गावडे व मागील कित्येक वर्षांपासून आपल्या भागात दांडगा जनसंपर्क ठेवलेले भाजपाचे जिल्हा परिषदेचे या गटातील उमेदवार राजेंद्र पोपटराव गावडे बेट भागातील प्रत्येक गावात सर्वापरचित आहेत.सर्वसामान्यांची कुठली ही कामे असोत ती प्राधान्याने सोडविण्याचे काम गावडे कुटुंब कित्येक वर्षांपासून सातत्याने करीत आहेत. एवढी मोठी केलेली लोकहिताची कामे,विकासकामे,पक्षनिष्ठा असून ही तिकीट डावलल्याने गावडे कुटुंबाने घेतलेला पक्षांतराचा निर्णय योग्यच झाला असल्याचे सर्वसामान्य मतदार,समर्थक चर्चा करताना दिसून येत आहे. गावडे यांच्या प्रवेशापूर्वी या जिल्हा परिषद गटात भाजपा नावाला जरी होती तरी तेच कट्टर भाजपा समर्थक निर्णायक आघाडी गावडे यांना देण्याची शक्यता ही वर्तवली जात असून त्यामुळे बेट भागात प्रथमच कमळ फुलणार ? असा जाणकारांचा अंदाज व्यक्त होताना दिसत आहे.



