मुरबाड विधानसभेतील निवडणुकीत अटीतटीची लढत ; एकतर्फी वाटणारा मुरबाड विधानसभा मतदार संघात रस्सीखेच

233
समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड मतदार संघ हा माजी महसूल मंत्री दिवंगत शांताराम भाऊ घोलप यांच्या अधिपत्याखाली असताना काँग्रेसचा बालेकिल्ला तर माजी आमदार गोटीराम पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बनला तर आता भाजपचे  विद्यमान आमदार किसन कथोरे यांनी या मतदार संघात एकहाती वर्चस्व निर्माण करत भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. यामुळें या मतदार संघात भाजप कुठलीही निवडणूक एकहाती व एकतर्फी जिंकेल अशी समीकरणे मांडली जात असताना लोकसभा निवडणुकीत भाजपला भिवंडी लोकसभा मतदार संघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारत तुतारी वाजवत भाजपला शह दिला. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे किसन कथोरे यांनाही आता संघर्ष करावा लागत असल्याने एकतर्फी वाटणाऱ्या मुरबाड मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीत रस्सी खेच पाहायला मिळत आहे.
भिवंडी लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या भूमिकेमुळे भाजपचे कपिल पाटील यांना पराभवाचा धक्का बसला त्याचं प्रमाणे मुरबाड विधानसभेत अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तर लोकसभा निवडणुकीत घडलेल्या अंतर्गत राजकारणा प्रमाणे माजी खासदार कपिल पाटील, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) मुरबाड यांच्या भूमिकांकडे सर्वांचे बारीक लक्ष आहे. तर सुरेश म्हात्रे यांचे मुरबाड मधील खंदे समर्थक मुरबाड नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष राम दुधाळे यांच्याकडे हि लक्ष आहे. पदाधिकाऱ्यांची भूमिका व कार्यकर्त्यांचे अंतर्गत गटबाजी यामुळे नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.  सध्या मुरबाड विधानसभेतील परिस्थिती पहाता चांगलीच रस्सीखेच पहायला मिळत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds