ग्रामपंचायत शिक्रापूर वाचनालयाचा आदर्श उपक्रम!!
समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : पुणे जिल्ह्यातील नगर पुणे रोडवरील शिक्रापूर येथील शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय ग्रामपंचायत शिक्रापूर येथे वाचनालयात बालदिन साजरा करीत तब्बल ७५ बालकांचा पेन्सिल, खोडरबर, शॉपनर ,गुलाब पुष्प भेट देऊन खाऊ वाटप करत बालदिन साजरा करण्यात आला. शिक्रापूर येथील ग्रामपंचायत मार्फत चालवल्या जाणाऱ्या शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालयाच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त “बाल वाचन मेळावा” वाचनालयात मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी शिंदे,आदर्श ग्रंथपाल संतोष काळे, प्रमुख पाहुणे संतोष गावडे गुरुजी (अध्यक्ष- शिरूर तालुका शिक्षक संघ.), संजय थिटे गुरुजी, नाट्य परिषदेचे सदस्य राजाराम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुरज चव्हाण, प्रशांत वाबळे, अविनाश कदम, ग्रामपंचायत क्लार्क गणेश भुजबळ, वाचनालय शिपाई अनंता दरवडे, मोहम्मदभाई तांबोळी, विद्यार्थी विद्यार्थिनी बालवाचक आदी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत मान्यवरांच्या हस्ते बालकांना पेन्सिल, खोडरबर, शॉपनर, पुष्पगुच्छ व खाऊचा वाटप करत भेट देण्यात आले. दरम्यान कु.उत्कर्षा दानवे, कु.जिज्ञासा मगदूम, कु.मनस्वी नाईक, कु.जीविका वानखेडे या विद्यार्थिनींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर सुंदर भाषणे करत पंडित नेहरू यांच्या कार्याला उजाळा दिला. सरपंच रमेश गडदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी बालकांना सदिच्छा व शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष गावडे गुरुजी ,संजय थिटे गुरुजी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विषयी लहान मुलांना माहिती देत वाचनाने जीवन समृद्ध होत असल्याने दररोज पुस्तकाचे वाचन करावे असे सांगितले. तसेच पुढील काळात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी व नवीन पिढी घडण्यासाठी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना वाचनालयाचे सभासद करणार असल्याचेही यावेळी गावडे व थिटे सर यांनी सांगितले. यावेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक आभार ग्रामपंचायत वाचनालयाचे आदर्श ग्रंथपाल संतोष दशरथ काळे यांनी केले.