समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर सेंट जोशेफ इंग्लिश मेडीयम स्कुल येथे सुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये लहान गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठे येमाई येथील मुलींनी लंगडी स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगीरी करीत तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. मागील ३ दिवसांपासून या प्राथमिक शाळा स्तरावरील मुलींच्या व मुलांच्या विविध क्रीडा प्रकारातील स्पर्धा शिरूर रामलिंग येथे सुरु असून आज स्पर्धेचा शेवटचा दिवस असल्याचे कवठे प्राथमिक शाळेतील वरिष्ठ उपशिक्षक सखाराम फंड यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले. कवठे गावठाण शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना गावडे,खोमणे यांच्या उपस्थितीत कवठे प्राथमिक शाळेच्या लंगडी मुली लहान गटातील स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तालुकास्तरीय प्राथमिक शाळा मुलींच्या लंगडी लहान गटात दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल सर्व विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षकांचे गटविकास अधिकारी महेश डोके,गट शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर,तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी सदाशिव व्हनमने,सहायक पुरवठा निरीक्षण अधिकारी दीपक केदार,शिरूर पंच्यात समितीच्या माजी सदस्या डॉ.कल्पना पोकळे,सरपंच मनीषा पांडुरंग भोर,उपसरपंच राजेंद्र इचके,माजी उपसरपंच निखिल घोडे,शाळाव्यस्थापन समितीचे अध्यक्ष भरत भोर,उपाध्यक्षा अर्चना देवकर,डॉ.आरती उचाळे,शिक्षण तज्ञ संचालक प्रा.पत्रकार सुभाष शेटे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पोपळघट,सचिव अशोकराव रेणके,भाऊसाहेब घोडे,प्रशांत सांगडे,सुभाष उघडे,ज्ञानदेव रोकडे,अजित शिंदे व अनेक ग्रामस्थांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



