समाजशील न्यूज नेटवर्क धनकवडी,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) : पुण्याच्या धनकवडी परिसरातील पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर परिसरात अनेक ठिकाणी असलेले ड्रेनेज सेफ्टी असल्यामुळे सारखेच तुंबत होते.परिसरातील रहिवास्यांना यामुळे अनेक समस्यांचा त्रास होत होता अनेक ठिकाणी दुर्गंधी सुरूतून आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. हीच बाब लक्षात घेत परिसरातील नागरिकांनी त्यांना जाणवणाऱ्या समस्यांचा पाढाच येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवती उपाध्यक्षा श्रीमती वर्षात ताई नाईक यांच्याकडे सातत्याने मांडला. इतर ही अनेक छोट्या मोठ्या समस्यांचा समन्वयातून विना शुल्क,प्रसंगी अनेकदा स्वखर्चातून लीलया सोडवनूक करणाऱ्या श्रीमती नाईक यांनी तुंबलेल्या ड्रेनेज प्रश्नी स्वतः लक्ष घालून अनेक ठिकाणचे ड्रेनेज साफ करणारे बोलावून घेत ताबडतोब एका दिवसातच ड्रेनेज साफ करून घेत परिसरातील रहिवाशांना दिलासा देण्याचे काम नाईक यांनी केले आहे. जरी एकदा ड्रेनेज साफ केले की पुन्हा लगेचच भरत असतात. आणि त्या ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर किंवा इतर सोसायटीमध्ये जात असे व त्यांना ते त्रासदायक ठरत असे.

हीच बाब लक्षात घेत श्रीमती वर्षा नाईक यांनी माजी महापौर दत्ताभाऊ धनकवडे यांच्या समवेत परिसरातील महिलांसह नुकत्याच झालेल्या समन्वय बैठकीत धनकवडी पुण्याई नगर परिसरातील सातत्याने नागरिकांना कराव्या लागत असलेल्या ड्रेनेज संदर्भातील समस्या सविस्तर मांडली व या परिसरात तातडीने ड्रेनेज लाईन टाकून दिली की हा प्रश्न मिटेल. कारण प्रत्येक ठिकाणच्या सोसायटी मधल्या लोकांना सारखे सारखे ड्रेनेज साफ करणारे बोलावणे परवडत नाही.त्याचा खर्च सुद्धा जास्त होतो.असे मीटिंगमध्ये नम्रपणे त्यांना सांगितले होते. नागरिकांची समस्या कोणती ही असो ती प्राधान्याने सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे माजी महापौर दत्ताभाऊ धनकवडे यांनी सुद्धा त्या बैठकीत ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ करून देण्याचे आश्वासन श्रीमती नाईक यांना दिले होते. अगदी महिनाभराच्या आत च पुण्याई नगर परिसरात सगळीकडे नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरु झाले आहे. परिसराचे प्रतिनिधित्व केलेले पुण्याचे माजी महापौर दत्ताभाऊ धनकवडे यांनी ड्रेनेज समस्यांचा महत्वपूर्ण प्रश्न तात्काळ सोडविण्याकामी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वर्षा नाईक यांनी मांडलेल्या सूचनेची तात्काळ दाखल घेत धनकावडीच्या पुण्याई नगर व इतर ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरु केले आहे तर काही ठिकाणचे काम पूर्ण देखील झाले आहे.ड्रेनेज चा प्रश्न मार्गी लागत असल्याने परिसरातील नागरिकांनी माजी महापौर दत्ताभाऊ धनकवडे व श्रीमती वर्षाताई नाईक यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले आहेत .



