वर्षाच्या अखेरीस युवा क्रांतीच्या उत्कृष्ट संघटन वृद्धीसाठी भव्य अभियान : २०२५ मधील शेवटचे ३ दिवस बाकी : राज्यस्तरीय उत्कृष्ट सदस्य जोडो अभियानात सहभागी व्हा : संघटनेचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख मार्गदर्शक प्रा.पत्रकार सुभाष शेटे यांचे आवाहन

100
   समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – अन्याय अत्याचार,भ्रष्टाचारा विरुद्ध मागील तीन वर्षांपासून राज्यभर सातत्याने लढा देत असलेल्या व मा.रविंद्र सूर्यवंशी संथापक अध्यक्ष असलेल्या युवा क्रांती फौंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेत राज्यस्तरीय उत्कृष्ट सदस्य जोडो अभियानात सहभागी होण्यासाठी  २०२५ मधील शेवटचे ३ दिवस बाकी असून युवा क्रांतीच्या प्रत्येक निष्ठावंत पदाधिकारी व सभासदांनी अधिक जोमाने संघटन वाढवून आपली युवा शक्ती अधिक मजबूत करण्याचे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख मार्गदर्शक,वरिष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील युवा शक्तीला एकत्र आणणाऱ्या युवा क्रांती संघटनेतर्फे अत्यंत गौरवास्पद व प्रेरणादायी असे हे सदस्य जोडो अभियान असून संघटनेने वर्षाच्या अखेरीस उत्कृष्ट संघटनवृद्धीसाठी एक भव्य अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.२०२५मधील राज्यस्तरीय उत्कृष्ट सदस्य जोडो अभियान असून २५ डिसेंबर रात्री बारा वाजेपर्यंत हे अभिअयान सुरु राहणार असल्याची माहिती संघटनेचे संथापक अध्यक्ष मा.रविंद्र सूर्यवंशी यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.दरम्यान या कालावधीत महाराष्ट्रातील जे ही पदाधिकारी किंवा सदस्य भारतातील कुठल्याही राज्यातून भागातून किमान ११ नवीन सदस्य संघटनेत यशस्वीरित्या जोडतील त्यांना संघटनेचा सर्वांत मानाचा व प्रतिष्ठेचा उत्कृष्ट संघटन कौशल्य महाराष्ट्र भूषण २०२५ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार संघटनेच्या वर्धापन दिन समारंभात अत्यंत दिमाखात प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कारामध्ये मानाचा फेटा,२०२५उत्कृष्ट संघटन कौशल्य ट्रॉफी,सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे स्वरूप असून वर्धापन दिन सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेल्या मान्यवरांच्या समक्ष गौरवपूर्ण सन्मान केला जाणार आहे.याच बरोबर जे पदाधिकारी,सदस्य शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, प्रश्नी संघटने अंतर्गत सुरु असलेल्या राष्ट्रीय किसान मंच अंतर्गत काम करण्यास इच्छुक असतील ते देखील ११ सदस्य जोडून या पुरस्कारासाठी दावेदार ठरणार असल्याने गावोगावी राष्ट्रीय किसान मंच च्या शाखा सुरु करा.त्यात ही ११ सदस्य पदाधिकारी जोडा,व संघटन अधिक शक्तिशाली बनवा असे कळकळीचे आवाहन राष्ट्रीय किसान मंच चे संकल्पक,प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे यांनी केले आहे. त्याकरिता तात्काळ काम सुरु करा व संघटक अधिक मजबूत करा असे आवाहन ही प्रा.शेटे यांनी केले आहे.अधिक माहिती साठी तात्काळ रविंद्र सूर्यवंशी सरांशी संपर्क करा.
 हीच वेळ, हीच संधी ,हीच युवा क्रांतीची शक्ती.वर्षाच्या शेवटच्या या सुवर्ण क्षणी आपणा सर्वांनी संघटनेस नवे, समाजाभिमुख, कर्तबगार सदस्य जोडावेत व राज्यभरात युवा क्रांतीची मशाल,पताका अधिक उंच आणि अभिमानाने उंचावत आणि आपल्या नावावर २०२५ चा  उत्तम संघटन कौशल्य महाराष्ट्र भूषण पुरस्कार गौरव शिक्कामोर्तब करावा असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले आहे. महाराष्ट्रातून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किमान ५ किंवा त्यापेक्षा अधिक विजेते होतील त्या मार्गदर्शकांना देखील या विशेष मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात येईल.

रविंद्र सूर्यवंशी,संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष,युवा क्रांती,महाराष्ट्र पोलीस मित्र,प्रेरणादायी मार्गदर्शन पाटील डी. जी. सर,
राष्ट्रीय मार्गदर्शक युवा क्रांती, महाराष्ट्र पोलीस मित्र,वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रीय किसान विकास मंच तथा राष्ट्रीय मिडीया प्रमुख मार्गदर्शक युवा क्रांती महाराष्ट्र पोलीस मित्र,ए.पी.पगार सर जेष्ठ मार्गदर्शक, युवा क्रांती महाराष्ट्र पोलीस मित्र संघटना, शिवाजीराव शेलार,युवा अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस मित्र संघटना




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds