समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश, २०१५ च्या अनुषंगाने अपात्र शिधापत्रिकांची तपासणी ही एक सतत चालणारी प्रक्रिया असून त्याअंतर्गत राज्यभरात अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी सदाशिव व्हनमने यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक उद्या गुरुवार दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता तहसील कार्यालयात होणार असून, या बैठकीस तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीत अपात्र शिधापत्रिका तपासणी साठी लागणाऱ्या अर्जाचे वितरण करण्यात येणार असून दुकानदारांना आवश्यक त्या मार्गदर्शनाची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती ही व्हॅनमने यांनी दिली.
तालुका पुरवठा प्रशासनाने सर्व शिधापत्रिका धारकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या संबंधित स्वस्तधान्य दुकानदारांशी संपर्क साधावा. योजनेच्या निकषांनुसार आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील फॉर्म भरून दिनांक ५ मे पूर्वी सादर करावा. यासाठी योग्य ती माहिती पुरवून प्रशासनास सहकार्य करावेअसे आवाहन करण्यात आले आहे.व्हनमाने यांनी या बाबत अधिक माहिती देताना सांगितले की, या मोहिमेद्वारे अपात्र लाभार्थ्यांची शिधापत्रिका मधून गाळणी होऊन योग्य लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. सर्व दुकानदार व शिधापत्रिका धारकांनी या प्रक्रियेत सक्रीय सहभाग द्यावा.या मोहिमेमुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंत धान्यवाटप अधिक पारदर्शक व प्रभावी पद्धतीने होणार असून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.