समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील चांडोह गावच्या हद्दीत हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत साठा जप्त केला असून आरोपी फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे साडेसात वाजता लाखनगाव पुलाजवळील काटवण परिसरात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यावेळी भानुदास शिवराम गाडगे (रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) हा इसम ६० लिटर हातभट्टीची तयार दारू (किंमत अंदाजे 3000 रुपये) विक्रीसाठी बाळगत असल्याचे आढळले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.पोलिसांनी दारूचा साठा जप्त केला असून याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मुंबई प्रोहिबिशन कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत चांडोह गावात बेकायदा दारू साठा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास चांडोह येथील आप्पाची खानावळ हॉटेलच्या शेजारी आरोपी देविदास उर्फ रामदास नानाभाऊ शिंदे (वय ४२, रा. चांडोह) याच्याकडे देशी-विदेशी दारूचा साठा बेकायदेशीर विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी छापा टाकून सुमारे १९ हजार रुपयांचा विविध कंपन्यांच्या दारूचा साठा जप्त केला.याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मुंबई प्रोहिबिशन कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे

