NEWS
Search

पिंपरी-चिंचवडमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य रिक्षा रॅली उत्साहात

256

समाजशील न्यूज नेटवर्क,पिंपरी-चिंचवड : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पिंपरी चिंचवड शहरात क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ही रॅली पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथून सुरू होऊन निगडीपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली.

या रॅलीचे आयोजन निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्यकारणी प्रमुख पुणे शहर महालिंग स्वामी यांनी केले होते. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने रिक्षाचालक सहभागी झाले होते. शहरातील विविध भागातून सहभागी झालेल्या रिक्षांच्या ताफ्यामुळे वातावरणात जल्लोष आणि उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले.यावेळी छावा वाहन चालक मालक कामगार संघाचे संस्थापक उपाध्यक्ष लक्ष्मण भाऊ शेलार यांच्यासह पदाधिकारी रवींद्र लंके, समीर इनामदार, हिरामण गवारे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी रॅलीत सक्रिय सहभाग घेत जयंती उत्सवाला विशेष रंगत आणली.महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि समाजात एकात्मतेचा संदेश पोहोचावा, या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *