समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (देवकीनंदन शेटे,संपादक) – जागतिक महिला दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल कवठे यमाई येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील ३७५ विद्यार्थीनीना स्व संरक्षणासाठी विविध प्रकारची प्रात्यक्षिक करण्याच्या एक दिवशीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी राजमाता प्रतिष्ठान च्या संस्थापक अध्यक्षा व कवठे येमाई ग्रामपंचायत सदस्य वैशालीताई रत्नपारखी व किसान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित ऑल स्पोर्ट्स आणि करिअर अकॅडमी महाराष्ट्र यांच्या संयुंक्त विद्यमानाने हे मुलींसाठी प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राजमाता प्रतिष्ठान च्या संस्थापक अध्यक्षा वैशालीताई रत्नपारखी,सविता इचके,डॉ.आरती उचाळे,रंजना कुंभार,रेखा कांदळकर,दर्शना राजगुरु, कुंदा निचित,हेमा कड्डडे,रंभा गांगर्डे प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख सखाराम फंड, न्यू इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापक अविनाश थोरात,मच्छिन्द्रनाथ करंजकर व अनेक शिक्षिका उपस्थित होत्या. मिलिंद ठोके ब्लॅक बेल्ट 3 डॅन (जपान) संस्थापक किसान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित किसान ऑल स्पोर्ट्स & करिअर अकॅडमी, संजय तांबे अध्यक्ष किसान स्पोर्ट्स अकॅडमी, भूषणबापू घोलप प्रमुख सल्लागार किसान स्पोर्ट्स अकॅडमी, शीतल वीर अध्यक्षा किसान संस्था, किसान स्पो. अकॅडमी, गायत्री गाडमवाड महिला प्रशिक्षक हे उपस्थित होते