समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे: (देवकीनंदन शेटे, संपादक) – या जीवनाच्या वाटेवर चालत असताना अनेक खाचखळगे जिवाला पार करावे लागतात तेव्हाच कुठे आपल्या स्वप्नांनाआकार प्राप्त होत असतो.परंतु ज्यावेळी ते पाठीशी असणारे अनुभव त्याला क्षणाक्षणाला त्याला सावध करतात. व समाजात घडणाऱ्या गोष्टी कडे पाहिल्यानंतर जीवाची घालमेल होते.व त्यातुनच एक क्रांतीचा नवा अंकुर जन्म घेतो व अन्यायाविरुद्ध लढण्यास तो सज्ज होतो. ज्यादिवशी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरुद्ध भडाग्नी पेटला गेला त्यातूनच एक ज्वलंत क्रांती उदयास आली व एका सामाजिक कार्याची मशाल पेटवली गेली. ही गोष्ट आहे सन २०२२ मधली.अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील अन्यायाचा चटका बसलेल्या एक सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या जिगरबाज योद्धयाची.रविंद्र सूर्यवंशी नावाच्या एका तुफानाने युवा क्रांती फाउंडेशनची स्थापना केली. समविचारी संचालक मंडळ स्थापन केले. सर्वसामान्यांना जीवनात येणाऱ्या अडचणी प्रसंगी प्रामाणिकपने काही मदत व्हावी या शुद्ध हेतूने रविंद्र सूर्यवंशी नावाच्या अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार मुळासहित उखडून टाकण्यासाठी युवा क्रांती पोलीस मित्र ग्राहक, पत्रकार संरक्षण, माहिती अधिकार संघटनेची कार्यास सुरुवात केली. त्यातूनच आज आपणास युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे हे भव्य दिव्य मंदिर व त्यातून च वटवृक्ष उभा राहिलेला आज आपणास पहावयास मिळत आहे.

संघटनेतील सर्व संचालक, राष्ट्रीय पदाधिकारी शूरवीर याप्रमाणे रात्रीचा दिवस, तहानभूक विसरून कामाला लागले असूनअनेक अडचणींचा सामना करीत,अडथळ्यांना पार करीत संस्थापक अध्यक्ष मा रवींद्र सूर्यवंशी व त्यांच्या असंख्य शूर मावळ्यांनी छत्रपतींच्या या स्वराज्यात लेकीबाळी च्या रक्षणासाठी माझ्या बळीराजाच्यागवताच्या काडीला ही कोणी धक्का लावणार नाही यासाठी भ्रश्टाचार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी गोरगरीब जनतेच्या रक्षणासाठी एकीची वज्रमूठ करुन दुश्मनांच्या काळजात मोठीच दहशत निर्माण केली.आज युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेची ही धगधगती मशाल शत्रूची राख रांगोळी करीत असून गोरगरीब,अनाथ,दीनदुबळे,महिला भगीनींचे रक्षण करण्याचे कार्य करीत आहे.महाराष्ट्रातील मुंबई,पुणे,नागपू र सह ४५ जिल्ह्यात व इतरत्र ही संघटनेचे कार्य उत्तम प्रकारे पोहोचले असून अभिमानाने सांगावे वाटते कि, पोलीस मित्र ही तेवढ्याच विश्वासाने संघटनेच्या ध्येय, धोरणांनुसार शोभेल असे प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. कोणतीही संघटना ही उभी राहत असताना तिला राजसत्ता,परमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता यांची जोड असावी लागते. म्हणून या पवित्र व्यासपीठावर राजकीय,सामाजिक, परमार्थिक मान्यवरांना आग्रहाचे स्थान देण्यात आले आहे. आज या छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले पाहताना मनाला जो आनंद होत आहे तो शब्दात वर्णन करता येणार नाही.
आपल्या सर्वांचे लाडके संघटनेचे आधारस्तंभ धैर्यवंत, गुणवंत, कीर्तिवंत, महत्वाचे म्हणजे सर्वांना जीवापलीकडे.उल्हासित करत असतात.शौर्याने भरलेले रविंद्र सरांचे हे जीवन चरित्र प्रत्येकाला जगण्यासाठी बळ देणारे ठरत आहे. माझ्या प्रत्येक पोलीस मीत्रानो हे लक्षात घ्या कि,जो मरतो, जळतो त्याचे चटके त्यालाच माहीत असतात म्हणून अशा या सच्चा दिल्याच्या माणसाने ही जी संघटना रूपी जनजागृती चळवळ उभी केली आहे. त्यासाठी किती कष्ट, त्याग केला असेल या माणसाने ही गोष्ट नक्कीच आपल्याला विचार करायला लावणारी आहे.मित्रांनो कल्पना करा की, कोणतेही काम एकट्याचे नसते त्याला एकनिष्ठ, दिलदार,समजदार जोडीदारांची नितांत गरज व भक्कम साथ तेवढीच महत्वाची असते.संघटना म्हटले की थोडेफार मतभेद, रुसवे फुगवे, मान पान आलेच पण हे सर्व विसरून ही सर्व संचालक मंडळी व अनेक एकनिष्ठ राज्य,राष्ट्रीय पदाधिकारी सन्मानीय रविंद्र सूर्यवंशी यांच्या पाठीशी एखाद्या पहाडा प्रमाणे साथ देताना खंबीरपणे उभे राहिल्यास पाहावयास मिळत आहे. कष्टमय जिवनाच्या प्रारंभातून कोपरगाव तालुकटातील शिर्डी येथून उभे राहिलेले युवा क्रांतीचे उभे राहिलेले छोटेसे रोप व त्याचा राज्यभरासह इतर राज्यात ही वटवृक्ष होताना पाहून मनापासून खूप आनंद होत आहे. संघटना उभी करीत असताना रविंद्र सरांना अनेक दिव्य अशा संकटाना पार करावे लागले.परंतु त्यांनी कधी ही ना डगमगता युवा क्रांतीचे हे वादळ महाराष्ट्र व देशहार पोहचविण्याचा चंग च बांधला आहे. त्याची मनोमन साक्ष नुकत्याच शिर्डी येथे झालेल्या संघटनेच्या तिसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून सर्वांना अनुभवावयास मिळाली. ( शब्दांकन – प्रा.पत्रकार सुभाष अण्णा शेटे,राष्ट्रीय मीडिया प्रमुख,मार्गदर्शक, युवा क्रांती तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान विकास मंच,महाराष्ट्र )