राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांचा पक्षाला राम राम – राजीनामा देत नाराजी व्यक्त

समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभेत राजकिय समीकरण बदलण्यास सुरुवात झाली असून, मुरबाड विधानसभेसाठी इच्छुक असलेले बदलापूर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष व नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी मुरबाड विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने पक्षाच्या प्राथमिक सदस्य व सर्व जबाबदाऱ्याचा राजीनामा देत आपली भुमिका स्पष्ट केली आहे. पडत्या काळात पक्षाला बळ देऊन मुरबाड विधानसभेत सतत जनसंपर्क ठेऊन हि पक्षाने तिकीट नाकारल्याने एका निष्ठावंत कार्यकर्ताला पक्ष सोडावा लागल्याची खंत व्यक्त केली जात आहे. मागील निवडणुकीत हि ते राष्ट्रवादी काँग्रेस मधून इच्छुक असताना अजित पवार यांच्या मूळे प्रमोद हिंदूराव यांना संधी देण्यात आली. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर शैलेश वडनेरे यांनी तुतारी हातात घेतली. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेतून बाहेर पडलेले सुभाष पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्या ने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी वैयक्तिक कारण पुढे करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपला राजीनामा देऊन नव्या राजकिय समिकरणाला दिशा दिली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *