समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभेत निवडणुकीच्या रणसंग्राम सूरू झाल्याचे दिसुन येतं असून महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान भाजप आमदार किसन कथोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे महायुतीतूनच शिवसेना शिंदे गटाला सोडून माजी आमदार पुत्र व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश घेऊन आपली उमेदवारी निच्छित केल्याने आता किसन कथोरे विरुद्ध सुभाष पवार अशी थेट लढत पहायला मिळणारं आहे.या लढतीमुळे मुरबाड विधानसभा मतदार संघात बदलाचे वारे दिसुन येतं असून 2009 च्या निवडणुकीतील माजी आमदार गोटिराम पवार यांचा पहाता या निवडणुकीत याचा राजकिय बदला घेण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. मी ही निवडणूक कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणून लढवत असून विकासाच्या मुद्द्यावर, रोजगाराच्या मुद्द्यावर लढणार आहे. मी ज्या पक्षात असतो त्या पक्षाशी प्रामाणिक रहातो मागील 2019 च्या निवडणूकीत मी महायुतीत असल्याने किसन कथोरे यांचे काम निष्ठेने केलें होतें. तर आज त्यांच्या विरोधात लढणार आहे. असे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यावेळी विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आमदार किसन कथोरे यांचे नाव न घेता टीका करताना म्हटले की जिथे खड्डे संपतात्त तेथें आपला मतदार संघ संपतो पण सध्या मतदार संघ खड्ड्यात असून विकास झाला असं म्हटल जात आसेल तर 15 वर्षात जेवढे नारळ फुटले नाहीं तेवढे निवडणूकी पुर्वी कसे फुटले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.. उमेदवारी साठी मुख्यमंत्र्यांना सोडावे लागले याचे दुखः जरी असले तरी कार्यकर्त्यांचा आग्रह टाळू शकतो नाहीं असे ही त्यांनी स्पष्ट केले.
चांगला निर्णय घेतला दादा ,Next MLA मुरबाड चे आपणच आहात