भाजप ठाणे ग्रामीण नव्या जिल्हाध्यक्ष निवडीमुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष पेटणार?

738

समाजशील न्यूज : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : भिवंडी लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरें यांनी पक्ष विरोधात काम केल्याने भिवंडी लोकसभेत भाजपला पराभव पत्करावा लागला असा आरोप करत माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी तक्रार देऊन आमदार किसन कथोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पक्ष कारवाई करणार का? असा प्रश्र्न उपस्थित करून त्यांचे विधान सभेचे तिकिट कापले जाऊन मुरबाड विधानसभा महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाला मिळवण्याचा प्रयत्न सुरु असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्यावर विश्र्वास दाखवत त्यांना भाजपच्या पहिल्या यादीत उमेदवारी घोषीत करत माजी खासदार कपिल पाटील यांचे खंदे समर्थक व जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे यांची पदावरून हटवून नवे जिल्हाध्यक्ष जितेन्द्र डाके यांची निवड करून शह दिला आहे. त्यामूळे मुरबाड भाजप मधील संघर्ष आणखी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ठाणे जिल्हा अध्यक्ष पदावर कपिल पाटलांचे खंदे समर्थक मधुकर मोहपे या उच्चशिक्षीत कुणबी  नेत्याची नेमणूक झाली होती. परंतु वर्षभारापासून मधुकर मोहपे यांना हटविण्यासाठी आमदारा कडून प्रयत्न सुरू होते,  त्या पदावर डाके यांची नियुक्ती होताच गुदमरलेले सुस्कारा सोडला, अशी प्रतिक्रिया मधुकर मोहपे यांना पदावरून पायउतार झाल्यावर समोर आली आहे. यामुळे विधानसभेला देखील भाजपातील दोन्ही गटातील संघर्षाला धार येणार आहे, ठाणे जिल्ह्यात  भाजपा कडून नेहमी कुणब्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला जात होता व त्याला या घटनेने पुष्टी मिळाली आहे. मात्र कागदाच्या तुकड्या वरील “पदावर  नाही तर आपल्या स्वकर्तुत्वावर प्रतिष्टा निर्माण करण्याची धमक असलेल्यांना त्यांची गरज भासत नाही , ऐन विधानसभा निवडणूतीत उच्चशिक्षीत कुणबी नेत्याला पायउतार केल्यावर भाजपातील कुणबी नेत्याकडून भले जल्लोश साजरा होईल ही परंतु  तुम्ही देखील सुपात आहात यांच भान ठेवायला हवं असा इशारा मधुकर मोहपे यांनी जबाबदारीतुन मुक्त झाल्यावर दिला आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds