जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमी परिषदेच्या वतीने ‘सांस्कृतिक महोत्सव’ संपन्न

4

समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :  जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमी परिषदेच्या वतीने पुणे येथे आयोजित केलेला सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला. सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून इन्कलाब झिंदाबाद हे नाटक सादर करण्यात आले. कविता कुंडले यांनी “यादों की बारात” हे गाणे गायले. हर्षदा वाळके,प्रविण जगदाळे,सौ.सारिका यांचे सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीची सुंदर चित्रे काढली.विद्यार्थिनींनी इंग्रजी प्रार्थनेवर नृत्य सादर केले. मुख्याध्यापिका दीपाली शिंदे,शिक्षक गायत्री अलनेवार, हनुमंत लांडगे, गणेश गायकवाड,कला शिक्षिका प्रियांका कटारिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हाध्यक्षा दिपाली शेळके, उपाध्यक्ष अरुण पटवर्धन, कोषाध्यक्ष स्मिता पटवर्धन,माणिक आढाव, प्रमिला आढाव, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरूर शाखेचे सदस्य तसेच प्राचार्य विकास पवळे, शिक्षक श्री.मर्तनवार, श्रीमती वाळके, श्रीमती खिलारे तसेच इतरही शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds