समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : सामाजिक सलोखा जपत हिंदू-मुस्लीम ऐक्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होत असल्याचे प्रतिपादन शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनी केले. शिक्रापूर (ता.शिरूर) येथील जामा मस्जिदमध्ये बारा बलुतेदार संघटनेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमात सरपंच रमेश गडदे बोलत होते. या कार्यक्रमात बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष कुंदन गोसावी यांनी सर्व मुस्लिम बांधवाना रमजानच्या शुभेच्छा देऊन हिंदू-मुस्लिम ऐक्याची जोपासना करण्याचे आवाहन केले. यावेळी शिक्रापुरचे पोलीस पाटील ज्ञानोबा विरोळे पाटील, बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष कुंदन गोसावी, सचिव पप्पू गुरव, कार्यवाहक अंकुश घारे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, युगपुरुष सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोंडे, हाजी सिराजभाई शेख, हाजी चांदभाई तांबोळी, आयुब तांबोळी, सलीम तांबोळी, फिरोज तांबोळी, सादीक तांबोळी, महंमद तांबोळी, अब्दुलभाई तांबोळी, मन्सूरभाई इनामदार, मौलाना अशरफ, नुरमहंमद मुल्ला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एन.बी.मुल्ला यांनी केले तर हाजी सिराजभाई शेख यांनी आभार मानले.