समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील त्यांच्या पत्नी रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी व छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन कार्यक्रम आज शनिवार दि. २९ ला शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इन्गिश स्कुल व जुनिअर कॉलेज मध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन प्राचार्य जगदीश टिकले हे होते.

कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचेही योगदान अत्यंत मोलाचे आहे. लक्ष्मीबाईनी रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत तनमनधन अर्पण केले. म्हणून त्यांच्या पद परिसस्पर्शाने रयत शिक्षण संस्थेचे सोने झाले. इ . स . १९३० साली लक्ष्मीबाईचे निधन झाले. पण त्यांनी मरणोत्तर आपली व्यक्त केलेली इच्छा म्हणजे बोर्डींगमध्ये सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश असावा व दुसऱ्या दिवशी पाडव्याचे जेवण सर्वांनी घ्यावे. या त्यांच्या विचारावरुन त्यांच्यातील दूरदृष्टी व समाजहिताची सदोदीत घेतलेली काळजी याची ग्वाही पटते. लक्ष्मीबाईंचा आदर्श व कृती ही भारतीय स्त्रियांना आजही प्रेरणा देणारी घटना आहे. त्याची आठवण म्हणून पुढे सौ. लक्ष्मीबाई पाटील मेमोरिअल एज्युकेशन फंड हा उपक्रम सुरु करण्यात आला. आज या फंडातून गरीब होतकरु आणि गरजू हजारो विद्यार्था याचा फायदा आज घेत आहेत.आजच छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन ही महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी शिक्षक विद्यार्थी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.वरिष्ठ पत्रकार व युवा क्रांती फाउंडेशनचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख मार्गदर्शक,राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुभाष अण्णा शेटे हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश टिकले,शिक्षक अविनाश थोरात, दत्तात्रय गायकवाड,सखाराम दाभाडे महेंद्र दरवडे, शिवराम मुंजावडे, मच्छिन्द्रनाथ करंजकर, संतोष घोडे, संतोष सोनवणे, तुषार गाडेकर,अस्मिता गोडे,प्रवीण कोतवाल, हेमा कड्डे, शिल्पा नेहेरे,दर्शना राजगुरू,धनश्री तावरे,भाऊ शिंदे मामा,विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.