NEWS
Search

एनएमएमएस,सारथी परीक्षेत १३ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र – कवठे येमाई न्यू इंग्लिश स्कुलची उज्वल परंपरा कायम 

527
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शिरूरच्या पश्चिमेकडे रयत शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल कवठे येमाई ही एक नामवंत शाळा असून या विद्यालयातील ११ विद्यार्थ्यानी २०२४/२५ मध्ये घेण्यात आलेल्या एनएमएमएस,सारथी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले असून हे सर्वजण शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरले आहेत. त्यामुळे विद्यालयाने याही वर्षी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. शिष्यवृत्ती पात्र सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्राचार्य किसनराव रत्नपारखी,प्राचार्य जगदीश टिकले व सर्वच ग्रामस्थांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
कु.पिंजारी नाजिया वजीर,माळवदे श्रेया सोपान हे दोन विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती धारक तर कु.रोडे वैष्णवी शशिकांत,कु.भोसले अश्विनी कैलास, कु.पोळ समिक्षा ज्ञानेश्वर,कु.जाधव अन्वेशा हेमंत, वागदरे सुशिल सोपान,बोऱ्हाडे आयुष बाळू,वागदरे सोहम कानिफनाथ,पोळ यश विजय,रोडे कृणाल भरत,बोऱ्हाडे आदित्य शिवाजी,भोर साईराज दीपक हे अकरा  विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक म्हणून गाडेकर टी. बी.(बुद्धिमत्ता),मुंजावडे एस. डी. (गणित),गायकवाड डी. पी. (सामाजिक शास्त्र),कडडे एच. पी.(विज्ञान),यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य जगदीश टिकले,अविनाश थोरात,व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य,सर्व ग्रामस्थ,पालक कवठे येमाई यांनी अभिनंदन केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds