समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी व शेतकऱ्यांना हितावह ठरलेल्या ई-महाभूमी प्रकल्पातील सन २०२४/२५ या आर्थिक वर्षात डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८ अ खाते उतारे,फेरफार व मिळकत पत्रिका सामान्य नागरिकांनी ऑनलाईन डाउनलोड करून आपली कामे घरी बसून करून घेतली.यामुळे कोट्यावधी शेतकरी,नागरिकांना महसूल विभागाच्या या सेवेचा लाभ घेता येत आहे. महसूल विभागाच्या या डिजीटल क्रांतीतुन शासनाला २०२४/२५ या आर्थिक वर्षात ७६ कोटी ८० लाखांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती महसूलच्या या डिजिटल क्रांती चे जनक,पुण्याचे कर्तव्यदक्ष उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
वर्षभरात सातबारे,आठ अ तत्सम कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जावे लागत असे. व ती कागदपत्रे ही अनेकदा वेळेत मिळत नसत ही बाब लक्षात घेत ई फेरफार प्रकल्पाचे तत्कालीन राज्य समन्वयक व पुण्याचे विद्यमान उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी यासाठी शासनाकडे डिजिटल संकल्पना मांडत त्यास महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांना सोबत घेत सर्वांच्या विचारातून राज्यात इ फेरफार प्रकल्प सुरु केला.राज्यभरातील शेतकऱ्यांकडून या प्रकल्पास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने २०२४/२५ या एका वर्षात डिजिटल स्वाक्षरीत सातबारा ३ कोटी ३ लक्ष ७७ हजार ८७५ डाउनलोड झाले,डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारे ९६ लाख ५६ हजार ५२६ डाउनलोड झाले,डिजिटल स्वाक्षरीत फेरफार २० लाख ३१ हजार ५२२ डाउनलोड झाले आणि डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड १५ लाख २१ हजार ७९२ डाउनलोड झाले. आणि त्यानुन नक्कल फी म्हणून शासनाला ७६ कोटी ८० लक्ष रुपये महसूल प्राप्त झाल्याचे जगताप यांनी सांगितले.तर ई फेरफार व ई महाभूमी प्रकल्पास राज्यात मिळणारा प्रतिसाद व यश पाहून आत्यंतिक होते समाधान होत असल्याचे ही पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मूळ जांबुत गावचे असलेले पुणे उपजिल्हाधिकारी जगताप यांनी सांगितले.जगताप यांनी इ फेरफार प्रकल्प सुरु करून डिजिटल क्रांती घडवत शेतकरी,नागरिकांना दिलेल्या दिलासा व गरजेच्या सुविधेबद्दल युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच चे राष्ट्रीय महासचिव रविंद्र सूर्यवंशी,अध्यक्ष हभप नाना महाराज कापडणीस,उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार,राष्ट्रीय संघटक डॉ.राजेश्वर हेंद्रे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे व हजारो शेतकऱ्यांनी,नागरिकांनी जगताप यांचे अभिनंदन केले आहे.