तुषार आळंदीकर यांच्याकडून सलग पाच वर्ष स्वखर्चाने वाचनालयास दहा सभासद!!
याप्रसंगी रमेशराव गडदे आदर्श सरपंच ग्रामपंचायत शिक्रापूर, शिवाजी शिंदे (ग्रामपंचायत अधिकारी) , संतोष काळे पा. (आदर्श ग्रंथपाल ग्रामपंचायत शिक्रापूर.) प्रकाश वाबळे (ग्रामपंचायत सदस्य ), त्रिनयन कळमकर (ग्रामपंचायत सदस्य ), अशोक जाधव (कृषी सहाय्यक अधिकारी शिक्रापूर), तुषार आळंदीकर, हनुमंत मासळकर, चंद्रकांत खेडकर, बबनराव मांढरे , ग्रामपंचायत कर्मचारी अनंता दरवडे आदी वाचनालय सभासद व मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ स्वीकारले. वाचनाची प्रचंड आवड असल्याने व वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी तसेच वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने आपल्या ग्रंथालयास ग्रंथ भेट देत असल्याचे सौ. गडदे यांनी सांगितले. तसेच आळंदीकर यांनी यापुढेही हा उपक्रम सातत्याने चालू ठेवणार असल्याचे यावेळी सांगितले. येथील सुसज्ज व भरपूर ग्रंथसाठा उपलब्ध असलेले व उत्तम व्यवस्थापन व येथील कामाचे समाधान व्यक्त करत मनिषा गडदे यांनी ग्रंथपाल संतोष काळे पाटील यांचे विशेष कौतुक केले .तसेच वाचनालयाच्या उज्वल भविष्यासाठी सदिच्छा शुभेच्छा दिल्या .यावेळी स्वयंस्फूर्तीने ज्या नागरिकांना उत्तम दर्जाचे ग्रंथ भेट द्यावयाचे असतील त्यांनी ग्रामपंचायत वाचनालय शिक्रापूर येथे संपर्क करण्याचे आवाहन आदर्श ग्रंथपाल संतोष काळे पाटील यांनी केले आहे. यावेळी सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.