अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे शिक्रापूर येथे आयोजन

28
समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) :  शिरूर तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ समजली जाणा-या शिक्रापूर येथे दि.७ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. युवा कीर्तनकार ह.भ.प. आदिनाथ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली कलशपुजनाने हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरूवात होणार असून पहाटे ४ ते ६ काकडा भजन ,सकाळी ७ ते ११ यावेळेत ह.भ.प. हनुमान महाराज आळंदीकर यांचे ज्ञानेश्वरी पारायण,सकाळी ११ ते १२ यावेळेत गाथा भजन , सायंकाळी ५ ते ६ प्रवचन , सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन, रात्री १२ नंतर हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहेत. ज्ञानवृद्धी, सद्गुणांची जोपासना, सद्बुद्धी,भक्तीची आवड निर्माण झाली तर सर्वा़चे जीवन सफल होवून सुखसमाधान ,समृद्धी ,भगवंत प्राप्ती होणे , त्याकरिता संत संगती, साधुसंतांचे विचार डोळ्यापुढे ठेवून आचरणात आणणे आवश्यक आहे यासाठी या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे शिक्रापूर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदीर याठिकाणी आयोजन करण्यात आलं असल्याचे श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष  राजाभाऊ नारायणराव मांढरे पाटील, उपाध्यक्ष उत्तमशेठ गायकवाड,श्विश्वासबापू मांढरे पाटील, अर्जूनराव शिर्के, दिलीपराव कोठावळे यांनी सांगितले.

ह.भ.प. वैभव महाराज झेंडे, ह.भ.प.शुभम महाराज पोकळे ,ह.भ.प. गणेश महाराज भगत, ह.भ.प.बालाजी महाराज कुलथे, ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम, ह.भ.प.विद्याताई जगताप,ह.भ.प.गणेश महाराज ओझरकर यांचे कीर्तन, ह.भ.प.राजेंद्र महाराज गरूड, ह.भ.प.कैलास महाराज कापरे, ह.भ.प.गणेश महाराज भांगडे, ह.भ.प.हर्षदाताई इचके‌, ह.भ.प.गोविंद महाराज दौंडकर, ह.भ.प. शरद महाराज शास्त्री,ह.भ.प.रतनताई बोराटे यांचे प्रवचन सप्ताहकाळात पार पडणार असल्याचे शिक्रापूर ग्रामस्थांनी सांगितले.

संत तुकाराम भजनी मंडळ शिक्रापूर, गजलक्ष्मी महिला भजनी मंडळ शिक्रापूर, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ बजरंगवाडी, कानिफनाथ भजनी मंडळ माळ वस्ती, शिव शंभो भजनी मंडळ शिक्रापूर, भजनी मंडळ वाबळेवाडी, कल्पवृक्ष भजनी मंडळ शिक्रापूर या भजनी मंडळांचा हरिजागर सप्ताह काळात होणार आहे.

सोमवार दि.१४ एप्रिलला सकाळी ९ ते ११ यावेळेत ह.भ.प. सोपान महाराज सानप (शास्त्री) यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर विणेकरी तसेच अन्नदात्यांच्या सहकार्याने शिक्रापूर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताह सोहळ्याचा समारोप काल्याचे कीर्तन पार पडल्यानंतर दुपारी १२ नंतर महाप्रसादाने होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये प्रख्यात कीर्तनकार, प्रवचनकार ज्ञानदान करणार असल्याने भाविकांनी ज्ञानामृताचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्रापूर येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ मांढरे पाटील, उपाध्यक्ष उत्तमशेठ गायकवाड यांनी केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds