समाजशील न्यूज नेटवर्क,भुसावळ,जळगाव : (देवकीनंदन शेटे,संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या राष्ट्रीय युवती अध्यक्ष तथा युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच च्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीमती जयश्रीताई आहिरे यांचा नुकताच भुसावळ जिल्हा जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र हिरकणी कर्तबगार महिला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
मागील कित्येक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील गरजवंतांना,अडचणीत असलेल्या नागरिकांना सामाजिकतेची जाणीव ठेवत शक्य असेल तो मदतीचा हात देत,त्यांच्या अडचणींची सोडवणूक करीत दिलासा देण्याचे काम जयश्री ताई करीत आहेत. त्यांच्या ह्या कामाची विविध स्तरावर दाखल घेत त्यांचा वेळोवेळी सन्मान होत असून त्यांच्या याच उत्कृष्ट कामाची पावती म्हणून नुकताच भुसावळ जिल्हा जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र हिरकणी कर्तबगार महिला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.समाजातील सामाजिक चळवळीची तळमळ, समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला समाजसेवेच्या रूपेने न्याय मिळवून देण्याची त्यांची योग्य मार्गाने सुरुअसलेली सातत्यपूर्ण लढाई व त्या लढ्यात ताईंना मिळणारे यश यामुळेच जयश्री ताईंच्या कार्याची राज्यात सर्वत्र दाखल घेतली जात असून त्यांना मिळणाऱ्या विविध पुरस्काराबद्दल त्यांची एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाल्याने राज्यभरातून जयश्री ताई अहिरे यांचे अभिनंदन होत आहे.


जयश्रीताई अहिरे यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,हभप नाना महाराज कापडणीस,राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे ,नानासाहेब बढे,शिवाजीराव शेलार,किरण वाघमारे,डॉ.राजेश्वर हेंद्रे,सुदामभाऊ रणदिवे,प्रि यांका मुरकुटे,जयश्री इंगळे,जयश्री गावित,अमृतताई पठारे,मंगलताई सासवड,मीनाताई गवारे,वसुधा नाईक,वर्षा नाईक,संगीता रोकडे,वैशाली बांगर,प्रियांका शेलार,धुळ्याच्या शबाना शेख,श्रीवास्तव सर,दीपक पाटील,आनंदराव पगार,किरण बेंडाळे,व राज्यातील पोलीस मित्र राष्ट्रीय किसान विकास मंच संघटनेतील राष्ट्रीय,राज्यस्तरीय पदाधिकारी यांनी जयश्रीताईंचे अभिनंदन करीत पुढील त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.