समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या व राष्ट्रीय किसान विकास मंच च्या पुणे जिल्ह्यातील खराडी,पुणे येथे महत्वपूर्ण समन्वय बैठक संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी किरणराव वाघमारे महाराष्ट्र युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार हे होते.
या बैठकीत अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात संघटन वाढ करणे,त्या त्या जिल्ह्यात रिक्त पदे असल्यास जबाबदार पदाधिकाऱ्यांनी त्या संघटनेच्या ठिकाणी नवीन पदे नियुक्ती करणे,व पदाधिकारी, सदस्य यांनी संघटनेच्या माध्यामातून सामाजिक कार्य करण्यास प्राध्यान्यायाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी डॉ.गौतम दरेकर यांनी संघटने मार्फत राज्यातील विविध भागात आयुष्यमान भारत योजने अंतर्गत शिबीरे आयोजित करून आरोग्य विमा कवच सेवा विनामूल्य देण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. तर संघटने अंतर्गत पुणे – अहिल्यानगर राज्य महामार्गावर विविध ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत त्या त्या भागातील पोलीस स्टेशन ला संघटनेकडून पत्र देण्यात यावे जेणेकरून वाहतूक सुरळीत होण्यास पोलिस प्रशासन प्राधान्य देईल
रवींद्र सूर्यवंशी सर – राष्ट्रीय संस्थापक,अध्यक्ष युवा क्रांती पोलीस मित्र संघटना
– “युंवा क्रांतीच्या पुणे जिल्ह्यातील राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आज पुणे येथे घेतलेली बैठक नक्कीच संघटनेला बळ देईल.आज राज्यस्तरीय पदाधिकाऱयांनी पुणे येथील बैठकीत जे काही निर्णय घेतलेत त्यास संघटना प्राधान्याने या सर्वांच्या पाठीशी राहील. अशाच प्रकारचे कार्य राज्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करावे.”
आजच्या या बैठकीस राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष,युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र मिडीया प्रमुख,मार्गदर्शक जेष्ठ पत्रक्रकार सुभाष अण्णा शेटे, संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किरण राव वाघमारे,युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार,राष्ट्रीय सल्लागार,डॉ.राजेश्वर हेंद्रे,पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष रविंद्र गायकवाड,युवा उपाध्यक्ष डॉ.गौतम दरेकर,पश्चिम महाराष्ट्र युवा कार्याध्यक्ष भारत पंजाबी,राज्य महिला उपाध्यक्ष अमृतताई पठारे, राज्य महिला कार्याध्यक्ष,संगीता ताई रोकडे,राष्ट्रीय किसान विकास मंच च्या महाराष्ट्र राज्य महिला कार्याध्यक्ष,वैशाली ताई बांगर,महिला उपाध्यक्ष दिपालीताई आंबरे,पश्चिम महाराष्ट्र महिला वर्षाताई नाईक,महिला कार्याध्यक्ष मंगलताई सासवडे, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुदाम भाऊ रणदिवे,पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अमर पठारे,पुणे जिल्हा युवती अध्यक्षा मोहिनी खैरनार इत्यादी संघटनेचे मान्यवर पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली ही महत्वपूर्ण बैठक पुणे,खराडी येथील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष रविंद्र गायकवाड यांच्या कार्यालयात संपन्न झाली.