समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर,शिरूर : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) :- शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय ग्रामपंचायत शिक्रापूर येथील प्रशिक्षित ग्रंथपाल श्री संतोष दशरथ काळे पाटील राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार प्राप्त प्रशिक्षित ग्रंथपाल असून यांनी सन २०२१ रोजी ग्रामपंचायत वाचनालयास पुस्तके दान व भेट स्वरूपात देण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला चार वर्षे पूर्ण होत असून चौथ्यावर्षीही स्वयंस्पूर्तीने वाचनालयाचे वाचक व शिक्रापूर आजूबाजूच्या परिसरातील वाचक प्रेमी भरभरून प्रतिसाद देत असून आज अखेर पर्यंत जवळजवळ ३५ पुस्तक प्रेमींनी या वाचनालयास पुस्तके सप्रेम भेट दिलेली आहेत. येथील उत्तम व्यवस्थापन ,विनम्र सेवा व शिस्त यामुळे अल्पावधीतच शिक्रापूर ग्रामपंचायत चे वाचनालय पंचक्रोशीतील घराघरात पोहोचून लोकप्रिय झालेले असून अल्पावधीतच सदरचे वाचनालय नावारूपास आलेले आहे.
याचीच पोचपावती म्हणून शिक्रापूर येथील उत्तम वाचक असलेल्या व ग्रामपंचायत शिक्रापूर येथील कर्मचारी लिपिक सौ. मनीषाताई प्रशांत शिर्के यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने येथील वाचनालयास जपानी भाषेचा अभ्यासक्रम असलेली व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेली दोन पुस्तक संच सप्रेम भेट देत एक अनोखा संदेश दिलेला असून यामुळे शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचा फायदा होणार असून ग्रामपंचायत लिपिक सौ.मनीषाताई प्रशांत शिर्के यांनी एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला असून परिसरातून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. सदरचे पुस्तक संच शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेशराव गडदे ,उपसरपंच सौ पूजाताई भुजबळ, कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी श्री शिवाजीराव शिंदे, ग्रामपंचायत ग्रंथपाल संतोष काळे पाटील,सामाजिक कार्यकर्ते श्री दीपकराव भुजबळ ,श्री पोपटराव गायकवाड ,सा.समाजशीलचे जेष्ठ पत्रकार श्री राजाराम गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी सौ जयश्रीताई निंबाळकर, श्री सईराम वाबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक संच स्वीकारण्यात आले. ग्रंथपाल श्री .संतोष काळे पाटील यांनी आभार मानले.