शिक्रापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वंदना भुजबळ यांची निवड

149
समाजशील न्यूज नेटवर्क : शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर गावाच्या उपसरपंच पदी माजी सरपंच आबासाहेब करंजे व बापूसाहेब जकाते यांच्या पॅनल च्या वंदना रमेश भुजबळ यांची निवड झाली. पूजा दिपक भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत वंदना रमेश भुजबळ व शालन अनिल राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला. 17 सदस्य असणाऱ्या शिक्रापूर ग्रामपंचायत मध्ये मतदान पार पडल्यावर ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे मतमोजणी यांनी वंदना भुजबळ यांना विजयी घोषित केले. वंदना भुजबळ यांना आठ तर शालन राऊत यांना सहा मते पडली. शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी काम पाहिले.

यावेळी ग्रामपंचायत सभागृहामध्ये मयूर करंजे, सारिका सासवडे, कृष्णा सासवडे, शालन राऊत पूजा भुजबळ, त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, उषा राऊत, सीमा लांडे, विशाल खरपूडे, सुभाष खैरे, व मोहिनी संतोष मांढरे उपस्थित होते. यानंतर ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच वंदना भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. मा.उपसरपंच सुभाष खैरे यांनी सूत्रसंचालन केले तर मार्केट कमिटीचे माजी संचालक बाबासाहेब सासवडे, पॅनल प्रमुख बापूसाहेब जकाते, समता परिषदेचे संघटक सोमनाथ भुजबळ, मार्केट कमिटीचे माजी संचालक संजय जगताप, मा. उपसरपंच मयूर करंजे, देवेंद्र कोळपकर, जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष दिनकर कळमकर, मा.उपसरपंच पूजा भुजबळ, नेवसे ताई यांनी मनोगत व्यक्त केले.

आपल्या कारकीर्दिमध्ये गावच्या कचरा प्रश्न व फिल्टर पाणी लाईन या प्रश्नांवर काम करून गावचा सर्वांगीण विकास सर्व सदस्यांना बरोबर घेऊन करण्याचा निर्धार वंदना भुजबळ यांनी व्यक्त केला. रमेश भुजबळ यांनी आभार मानले. याप्रसंगी नाना विरोळे पाटील, मा. अरमन निलेश थोरात, बाळासाहेब लांडे, अर्जुन ताजने,बाबासाहेब भुजबळ, सत्यवान भुजबळ, पोपट गायकवाड, गौरव जाधव, भाऊ केवटे, अमर करंजे, सोमनाथ लक्ष्मण भुजबळ, जालिंदर जकाते ,सुदाम कळमकर ,नवनाथ भुजबळ ,भगवान मामा गायकवाड ,बाळासाहेब  राऊत आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds