सात दिवसात हेक्टरी 30 हजार रूपये नुकसान भरपाईची काँग्रेस ची मागणी

415

समाजशील न्यूज : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : अनेक दिवस ठाणे जिल्ह्यासह मुरबाड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने कापणीला आलेल्या भात पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने सात दिवसात हेक्टरी 30 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी मुरबाड तालुका काँग्रेस अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी मुरबाड तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे एका निवेदना द्वारे केली आहे.
मुरबाड तालुक्यातील शेतकरी मुख्यतः भात पिक व त्यानंतर मिळणारा पेंढा यातून मिळणारे उत्पन्न हेच त्यांच्या  कमाईचे साधन आहे पंरतु ह्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण पिके हे कुजण्याच्या मार्गांवर असुन त्या सोबत पेंढा देखील कुजला असल्यामुळे सदरच्या दोन्ही गोष्टींचा विचार करुन तालुक्यातील शेतकरी बांधवांना सरसकट हेक्टरी 30 हजार रु मदत द्यावी अशी मागणी चेतनसिंह पवार यांनी केली आहे.
मुरबाड तालुक्यामध्ये मागील 12 ते 13 दिवसापासुन अवकाळी पाऊस, व वादळी वारे यामुळें  शेतीचे विशेष करुन भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन तात्काळ पंचनामे सुरु करा असे प्रतिपादन अशोक फनाडे यांनी केले. यावेळी किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे, महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम, किसानचे कार्याध्यक्ष अशोक भावार्थे, तालुका पदाधिकारी वसंत जमदरे, तालुका सचिव भगवान तारमळे, जिल्हा अल्पसंख्याक शकील पठाण, तालुका संघटक गुरुनाथ देशमुख, महिला शहरअध्यक्ष शुभांगी भराडे, परिवहन आघाडीचे शहरअध्यक्ष संतोष लिहे, समीर ठाकरे, जयवंत हरड, हरि ठाकरे, शार्दुल हंबीर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पाहणी केल्यावर सर्व शेतकऱ्यांच्या भात पिकाचे संपुर्ण नुकसान झाल्याचे आढळून आले असुन पुढील दोन दिवसांत पंचनामे पुर्ण करु व नुकसानभरपाई जाहीर करण्याबाबत प्रयत्न करु असे आश्वासन तहसीलदार अभिजित देशमुख यांनी शिस्त मंडळाला दिले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds