मुरबाड विधानसभेत शैलेश वडनेरे अपक्ष लढणार ? तिरंगी लढतीची शक्यता !

67
समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड मतदार संघात 2019 पासुन इच्छुक असलेले बदलापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी मुरबाड विधानसभा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 ला एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस व आताच्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नुकताच पक्ष सदस्यत्व व पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सुपूर्द करून महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांना उमेदवारी दिल्याचा संताप व्यक्त केला. 2019 च्या निवडणूकी पुर्वी शिवसेना सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मुरबाड विधानसभेची उमेदवारी मागीतली होती ,मात्र अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले प्रमोद हिंदूराव यांना उमेदवारी दिली असतानाही त्यांनी पक्षाचे काम केले. मात्र 2024 निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मुरबाड विधानसभा पिंजून काढत लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम केले व त्यामूळे महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) हे निवडून आलें . मात्र सुभाष पवार यांनी निवडणूक लढविण्यासाठी सत्ताधारी शिवसेना पक्ष व खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळाल्याने शैलेश वडनेरे यांनी राजीनामा दिल्याने नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना त्यांनी कुठल्याही पक्षात न जाता अपक्ष निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. त्यांच्या अपक्ष लढल्याने महायुतीला फायदा होतो की महाविकास आघाडीला हे दिसणार आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत शैलेश वडनेरे आपली ताकद या निवडणुकीत आजमावणार असल्याचे त्यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds