सहकारातून समृद्धी,विकासकामांतून लोकाभिमुख कार्य करणारे एकमेव नेते – सहकार मंत्री ना. दिलीपराव वळसे पाटीलच – युवा नेते अशोकराव ज्ञानेश्वर गावडे

358
 समाजशील न्यूज नेटवर्क – शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  शिरूर,आंबेगाव तालुक्यात सहकारातून समृद्धी,विकासकामांतून धवलक्रांती करीत जनतेचे हित लक्षात घेत लोकाभिमुख कार्य करणारे एकमेव नेते असलेले राज्याचे सहकार मंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील हेच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील युवा नेते व श्री बालाजी डेअरी फार्म चे चेअरमन अशोकराव ज्ञानेश्वर गावडे यांनी सा.समाजशील शी बोलताना व्यक्त केले आहे. शिरूर तालुक्यातील ४२ गावे,आंबेगाव तालुका म्हणजे सतत दुष्काळी तालुका ही प्रतिमा तर वळसे पाटील यांनी आपल्या कृतीशील कामातून व शेतकऱ्यांचे हित जोपासत पुसलीच याच बरोबर सहकाराच्या वाटेने तालुक्यात समृद्धीहीआणली.भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, सहकारी बँक आणि दूध व्यवसायाचा विकास यांमुळे शेतकरी सुखी व समृद्ध झाले, आदिवासींची कुटुंबे स्थिरावली आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. माजी आमदार सहकारमहर्षी स्व. दत्तात्रय वळसे पाटील यांनी तालुक्याच्या विकासाचे एक स्वप्न पाहिले होते. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निर्मिती त्यातून झाली. जून १९९९ मध्ये कारखान्याचे भूमिपूजन झाले. नंतर दहा महिन्यांतच त्याची उभारणी झाली. नोव्हेंबर २००० पासून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला. शेतकऱ्यांच्या उसाला विक्रमी भाव देण्यात कारखान्याने सातत्य राखले आहे. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक मेळावे, ऊसलागवडीचे प्रशिक्षण, ऊस बेण्याचे; तसेच हिरवळीच्या खताचे वाटप, शैक्षणिक सहली असे उपक्रम कारखान्यातर्फे राबविले जात आहेत. . ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देतानाच कारखान्याने माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा व कंपोस्ट खत प्रकल्प यांची उभारणी केली आहे.
        तांत्रिक व आर्थिक व्यवस्थापनातील उत्कृष्टतेचे देश व राज्य पातळीवरील एकोणीस पुरस्कार कारखान्याला मिळाले आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या प्रथम क्रमांकाच्या पुस्काराचा त्यात समावेश आहे. घोडनदी व डिंभा कालव्यातून पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकरी हमाखास उत्पन्न मिळणारी ऊस शेती करू लागला. परिसरात उसाचे अधिक उत्पादन शेतकरी घेऊ लागल्याने कार्यक्षेत्रातील ऊस वेळेवर तोडला जावा या हेतूने कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यात आली असून या हंगामात साडेआठ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे कारखान्याला लागणारी
वीज उपलब्ध होते; शिवाय जादा वीज महावितरण कंपनीला दिली जाते. कारखान्यामुळे सुमारे साडेआठ हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ व रोजगार मिळाला आहे

आंबेगाव,शिरूर मध्ये दूधसंकलनात आघाडी
शिरूर,आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शेतीच्या प्रगतीबरोबरच पूरक व्यवसाय उभे करण्यासाठी नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी पुढाकार घेतला. जिल्हा दूध संघाप्रमाणेच दुधावर प्रक्रिया करणारे अनेक व्यवसाय,उद्योग सुरू करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. दुधाच्या उत्पादनात वाढ व्हावी,शेतकऱ्यांच्या आर्थिक श्रोतात अधिकची वाढ,मदत व्हावी यासाठी होल्स्टीन फ्रिजियन (एचएफ) वंशाच्या गाई
घेण्यासाठी शेतकऱ्यांना सहकारी संस्था, पतसंस्था यांच्यामार्फत कर्ज उपलब्ध केले. देशी गाईच्या तुलनेत होल्स्टीन गाई अधिक दूध देतात. (होल्स्टीन फ्रिजियन हा युरोपियन गोवंश आहे) जगभरातील दीडशे देशांत ही गाय आढळते. ती वर्षाला दहा हजार लिटरपर्यंत दूध देते.) दूध संकलनाच्या वाढीवर त्याचा चांगला परिणाम झाला. १९९० मध्ये या परिसरात अठरा ते वीस हजार दूध जमा होत असे. आता तेथील दूध संकलन सुमारे वीस लाख लिटरवर पोहोचले आहे. खासगी व सहकारी संस्थांची मिळून सुमारे तीनशे दूधसंकलन केंद्रे सध्या तेथे सुरू आहेत. दुधावर प्रक्रिया करणाऱ्या गोवर्धन सारख्या उद्योगासह इतर दूधप्रक्रिया प्रकल्पांमुळे रोज सुमारे वीस लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जात आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, गोवर्धन दूध,वेस्टर्न हिल फूड्स, पराग साखर कारखान,चॉकलेटनिर्मितीत देशात अग्रेसर असलेले मोरडे फूड्स इत्यादींमुळे अनेक रोजगार निर्माण झाले आहेत.
मागील ३५ वर्षांत आपल्या आंबेगाव मतदार संघाचा व १५ वर्षात शिरूर तालुक्यातील ४२ गावांचा विकासात्मक विचार करत कार्यरत असणारे या भागाचे गतिशील,कृतीशील आमदार ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या कार्याची जाण ठेवत आगामी निवडणुकीत ही मोठ्या मताधिक्याने जनता त्यांना नक्कीच विजयी करणार च व शिरूरच्या ४२ गावातील सुज्ञ जनता वळसे पाटील साहेबांनाच भक्कम साथ देईल असा ठाम विश्वास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चाहते,कट्टर समर्थकअशोकराव गावडे यांनी व्यक्त केला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds