आंबेगाव, शिरूर, जुन्नरच्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय – ना. वळसे पाटील यांच्या कडाडून विरोधामुळे डिंभे धरणातील पाणी तळातून बोगद्याद्वारे नेण्याचा डाव रोखला

498
आंबेगाव, शिरूर, जुन्नरच्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय – ना. वळसे पाटील यांच्या कडाडून विरोधामुळे डिंभे धरणातील पाणी तळातून बोगद्याद्वारे नेण्याचा डाव रोखला – शेतकरी वळसे पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार – आंबेगाव, शिरूर, जुन्नरच्या शेतकऱ्यांचा निर्धार 
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर-पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – दुष्काळातून सुकाळ पाहावयास मिळालेल्या व आंबेगाव, शिरूर, जुन्नरच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या व  आपल्या मतदारसंघाला सुजलाम् सुफलाम करणाऱ्या हुतात्मा बाबू गेणू सैद सागर -डिंभे धरणामुळे आपल्या दुष्काळी भागाचा शिक्का पुसला गेला. हुतात्मा बाबू गेनू सैद सागर अर्थात डिंभे धरणाच्या तळाशी बोगदा करून ते पाणी कर्जत जामखेड कडे पळविण्याचा डाव शिरूर,आंबेगावगाचे कार्यक्षम व कृतीशील आमदार खरे लोकनेते राज्याचे सहकार मंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील यांनी आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत या धरणातुन तळातून बोगदा करण्याची विरोधकांची मागणी ला सातत्याने कडाडून विरोध केला.आचारसंहिता लागू व्हायच्या आधीच महायुती सरकारने विशेषतः सरकार मधील उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,अजितदादा पवार,जलसंपदा मंत्री,पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या चर्चेतून डिंभे धरणाच्या तळातून हा बोगदा होणार नसल्याची माहिती खुद्द ना.वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 डिंभे धरणाचं आपल्या हक्काच पाणी पळवण्याचा डाव आपल्या पक्क्या निर्धारामुळे मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना रोखता आला.डिंभे या धरणाच्या डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी महायुती सरकारने ६८ कोटी ५६ लाखांचा निधी अलीकडेच दिला आहे. धरणाचा बोगदा कुठे करावा, ही केवळ राजकारणासाठी काहींनी सुरू केलेली चर्चाच आता पोकळ वल्गना ठरली आहे. आपल्या वैयक्तिक हितगुजा पेक्षाही  ना.वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या,जनतेच्या प्राधान्य मानून आपलं हक्काचं पाणी कायमचं अबाधित ठेवले आहे.या निर्णया मुळे आंबेगाव, शिरूर, जुन्नरच्या शेतकऱ्यांचा एकच निर्धार झालेला दिसत असून  मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचे मनःपूर्वक आभार मानतानाच आगामी निवडणुकीत शेतकरी,महिला व या भागातील सुज्ञ जनता वळसे पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील असा विश्वास शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,राजेंद्र गावडे,दीपक रत्नपारखी,सोनभाऊ मुसळे,माधुरीताई थोरात,शुभांगी पडवळ,नीता कोळेकर,वैशाली रत्नपारखी, बाळासाहेब डांगे, किसनराव हिलाळ,सचिन बोऱ्हाडे,राजेश सांडभोर,सुदाम भाऊ इचके,जयवंतराव भाकरे,खंडू जाधव,अशोकराव गावडे कवठे,मिठूलाल बाफना,रामदास बंडू कादंळकर,विलास रोहिले,शांताराम उचाळे,पोपट फिरोदिया व असंख्य शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds