समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील वयोवृद्ध आजोबा बबन गोविंद सांगडे यांचे रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात ४ मुले,एक मुलगी,सुना नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. येथील देवीचे भक्त अशोक सांगडे यांचे ते वडील तर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सांगडे,प्रियेश सांगडे यांचे ते आजोबा होते.